World Athletics Championships Triple Jump Eldhose Paul Create History Became First Indian To Qualify Finals esakal
क्रीडा

भारताच्या पॉलने इतिहास रचला; रोहितचे नीरजच्या पावलावर पाऊल

अनिरुद्ध संकपाळ

World Athletic Championship 2022 : भारताने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज दमदार कामगिरी करत भालाफेक (Javelin) आणि ट्रिपल जंपमध्ये (Triple Jump) अंतिम फेरी गाठली. भालाफेकीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीजर चोप्रा (Neeraj Chopra), रोहित यादव (Rohit Yadav) यांनी अंतिम फेरी गाठली. तर ट्रिपल जंपमध्ये एल्डहोस पॉलने (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठली. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ट्रिपल जंप प्रकारात अंतिम फेरी गाठणारा पॉल हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

नीरज चोप्रा 88.39 मीटर भाला फेकून पहिल्या प्रयत्नातच फायनलसाठी पात्र झाला. याचबरोबर चोप्रा फायनलच्या लिस्टमध्ये अव्वल आहे. त्यामुळे तो सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. पुरूष भालाफेकीत अजून एका भारतीय खेळाडूने चमकदार कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा पाठोपाठ रोहित यादवने देखील भालाफेकीची अंतिम फेरी गाठली आहे. रोहित 80.42 मीटर भाला फेक करत अंतिम फेरीसाठी पात्र होणाऱ्यांच्या 12 जणांच्या यादीत 11 व्या स्थानावर राहिला.

ट्रिपल जंपमध्ये एल्डहोस पॉल वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने पात्रता फेरीत ग्रुप अ मध्ये 16.68 मीटर जंप करत सहावे स्थान पटकावले. तर तो अतिंम फेरी गाठणाऱ्या 12 जणांच्या यादीत 12 व्या स्थानावर राहिला. आता ट्रिपल जंपची फायनल रविवारी (24 जुलै) सकाळी 6.50 मिनिटांनी होणार आहे.

भारताने यंदाच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत पहिल्यांदाच दमदार कामगिरी केली आहे. भारताचे सहा अॅथलिट वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत पोहचले आहेत. लांब उडीत श्रीशंकर, भालाफेकीत नीरज चोप्रा, रोहित यादव, महिला भालाफेकीमध्ये अन्नू राणी, ट्रिपल जंपमध्ये एल्डहोस पॉल तर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे यांनी अंति फेरी गाठली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

Navi Mumbai News: पनवेलचा पाणी प्रश्न सुटण्यास २०२६ उजाडणार, न्हावा-शेवा टप्पा-३ प्रकल्‍पास विलंब!

IND vs ENG 3rd Test: कंटाळवाण्या कसोटीत तुमचं स्वागत! शुभमन गिल अन् मोहम्मद सिराज ऑन फायर, स्लेजिंगचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT