मुस्कान किरार 
क्रीडा

जागतिक विजेतीची शिबिरातून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सांघिक ब्रॉंझ पदक जिंकलेल्या मुस्कान किरार हिची राष्ट्रीय कुमार शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिबिरात दोन दिवस अनुपस्थित असल्याचे सांगत ही कारवाई तातडीने करण्यात आली आहे.
मुस्कान तसेच तिचे मार्गदर्शक रिचपाल सिंग यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

मुस्कान 21 ते 24 जुलैदरम्यान जबलपूरला घरी गेली होती, तर तर रिचपाल हे 23 ते 25 जुलैदरम्यान पतियाळास गेले होते. आपण कोणालाही न सांगता रोहतक येथील जागतिक युवा स्पर्धेच्या शिबिरातून निघून गेलात, त्यामुळे या शिबिरातून आपले नाव कमी करण्यात आले आहे; असे पत्र देत त्यांना शिबिरातून घरी पाठवण्यात आले.

मुस्कान हॉस्टेल वॉर्डनना सांगून घरी गेली होती. त्याचबरोबर तिने शिबिरात पुन्हा दाखल झाल्याचे पत्र तेथील केंद्रप्रमुखांना दिले होते. तरीही तिच्यावर कारवाई झाली आहे. भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव वीरेंद्र सचदेव यांनी दोघांना किमान कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती. रिचपाल यांनीही आपण पूर्वकल्पना देऊनच गेलो होतो असे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Report Card: भारतीय संघांनी वर्षभरात जिंकल्या तीन ICC ट्रॉफी; वनडे-टी२०मध्ये वर्चस्व, पण कसोटीत घोर निराशा

Vasai Virar News : नवं वर्ष जल्लोषाला यंदा तळीरामाची पंचाईत होणार; एकादशी मुळे बार बंद!

Latest Marathi News Live Update : महापालिका निवडणुकीसाठी पुण्याची जबाबदारी असणार सुप्रिया सुळेंकडे!

Loni Kalbhor News : अवघ्या अर्ध्या तासात ५ एकर ऊस जळून खाक; लोणी काळभोरचे ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक नुकसान!

Mangalwedha Election : मंगळवेढा नगरपालिकेत क्रॉस मतदानाचा परिणाम; सुप्रिया जगतापचा पराभव; सुनंदा अवताडेला फायदा!

SCROLL FOR NEXT