World Cup 2023 esakal
क्रीडा

World Cup 2023 : 27 वर्षापूर्वी पुण्यातील पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात झाला होता मोठा उलटफेर

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Pune India Vs Bangladesh : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये 19 ऑक्टोबरला भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध खेळणार आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना म्हटलं तर सर्वांना 2007 चा तो सामना आठवतो. 17 मार्च 2007 रोजी बांगलादेशने भारताचा 5 विकेट्स राखून पराभव करत खूप मोठा धक्का दिला होता. यामुळे भारतीय संघाला ग्रुप स्टेडमध्येच गाशा गुंडाळावा लागला होता.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश - भारत हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर होणार आहे. पुणे देखील वर्ल्डकपमधील मोठ्या उलटफेर सामन्यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यात 1996 मध्ये पहिला वर्ल्डकप सामना झाला होता. हाच सामना 1996 च्या वर्ल्डकपमधील मोठा उलफेर झालेला सामना म्हणून ओळखला जातो.

ओदुंबेच्या नेतृत्वाखालील केनियाच्या संघाने वेस्ट इंडीजचा पराभव करत मोठा धक्का दिला होता. 29 फेब्रुवारी 1996 मध्ये ओदुम्बेने पुण्यातील नेहरू स्टेडियमवर वेस्ट इंडीजचा पराभव केला. आता 27 वर्षांनी पुन्हा पुण्यात वर्ल्डकपचा सामना होणार आहे. मात्र यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केनिया आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ नाहीयेत. मात्र तो सामना हा वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा अपसेट ठरला होता. केनियाने विंडीजचा 73 धावांनी पराभव केला.

पुण्यातील नेहरू स्टेडियमवर आता आंतरराष्ट्रीय सामने होत नाहीत. त्याची जागा गहुंजेच्या एमसीए स्टेडियमने घेतली आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत 68 सामने झाले आहेत. यात आयपीएलच्या सामन्यांचा देखील समावेश आहे. पुण्याचं स्टेडियम भारत आणि बांगलादेश सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज झालं आहे.

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर या सामन्याच्या तिकीट विक्रीत वाढ झाली. पुण्यात यंदाच्या वर्ल्डकपचे तब्बल 5 सामने होणार आहेत.

पुण्यात होणारे 5 वनडे वर्ल्डकप सामने

  • भारत - बांगलादेश : 19 ऑक्टोबर

  • अफगाणिस्तान - श्रीलंका : 30 ऑक्टोबर

  • न्यूझीलंड - दक्षिण आफ्रिका : 1 नोव्हेंबर

  • इंग्लंड - नेदरलँड : 8 नोव्हेंबर

  • ऑस्ट्रेलिया - बांगलादेश : 11 नोव्हेंबर

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

Kolhapur politics : मतदार यादीतील गोंधळ, सुनावणी पुढे ढकलली… महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग; इच्छुकांमध्ये चिंता वाढली

Latest Marathi News Live Update: संसद मार्गावरील निषेध प्रकरणातील आंदोलक न्यायालयात हजर

SCROLL FOR NEXT