World Cup 2023 ENG vs NZ esakal
क्रीडा

World Cup 2023 ENG vs NZ : स्टेडियममध्ये ; पहिल्याच सामन्यात तिकीट विक्रीचं भांड फुटलं?

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 ENG vs NZ : आयसीसी वनडे वर्ल्डकपचा 13 वा हंगाम आजपासून भारतात सुरू झाला. जगातील सर्वात मोठे स्टेडियम, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होत आहे. मात्र या सामन्यातील सुरूवातीची दृष्य पाहून आयसीसी आणि बीसीसीआयची तिकीट विक्री गंडली तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

वनडे क्रिकेटमधील दोन दिग्गज संघ आज वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात आमने सामने आहेत. तरी देखील चाहत्यांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. जवळपास एक लाख आसन क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील जवळपास सर्व सीट्स रिकाम्या पडल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या सामन्यात देखील प्रेक्षकांची याच्यापेक्षा जास्त गर्दी असते.

यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) या दोघांसाठी ही शरमेची बाब झाली आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने तिकीट विक्रीत बराच गोंधळ घातला होता. आता स्टेडियम रिकामे पडले आहे तसेच सर्व तिकीटे देखील विकली गेलेली नाही. सामन्याच्या दिवशी बुक माय शोवर अजून तिकीट विक्री सुरू होती.

यापूर्वी, भाजपने स्टेडियम भरण्यासाठी अहमदाबादमधील 30 ते 40 हजार महिलांना स्टेडियमला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते.

वाधवान यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, ' अहमदाबाद मधील 30 ते 40 हजार महिलांना आज तिकीट वाटली जातील. आमच्या स्वयंसेवकांना त्यांनी नावे पाठवण्यास सांगितले आहे. याचबरोबर महिलांना स्टेडियमपर्यंत स्वतःच यायचं आहे त्यांना चहा आणि नाष्ट्याचे कुपन्स मिळणार आहेत.'

गुजरात भाजपचे प्रवक्ते यमल व्यास यांना भाजप महिलांना स्टेडियममध्ये नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे का असे विचारले असता त्यांनी, 'आम्ही पक्षाच्या स्तरावर असा कोणताही प्रयत्न करत नाहेय. जर त्या मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येणार असतील तर ठीक आहे. मात्र पक्षाची यामध्ये कोणतीही भुमिका नाहीये.'

(World Cup 2023 Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT