World Cup 2023 esakal
क्रीडा

World Cup 2023 : मॅक्सवेलच नाही तर कपिल देव, इंझमामनेही केली होती क्रिकेटमध्ये अविश्वसनीय खेळी

आत्मविश्वासाच्या आठवणीत ग्लेन मॅक्सवेलची अविश्वसनीय खेळी...

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरूद्ध 201 धावांची नाबाद खेळी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानने ठेवलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंची अवस्था 7 बाद 91 अशी झाली होती.

त्यानंतर मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी घेत संघाला अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला त्याने आठव्या विकेटसाठी 202 धावांची नाबाद भागीदारी रचली.

ग्लेन मॅक्सवेलची ही इनिंग वनडे क्रिकेटमधील ग्रेट इनिंगमध्ये समाविष्ट करावी अशी आहे. त्याच्या या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी केल्लाय नाबाद 175 धावांच्या खेळीची आठवण झाली.

कपिल देव यांच्या झिम्बाब्वेविरूद्धची 175 खेळी

ग्लेन मॅक्सवेलप्रमाणेच कपिल देव यांनी देखील 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढळे होते. भारताची झिम्बाब्वेविरूद्ध 5 बाद 17 धावा अशी अवस्था झाली होती. त्यावेळी कपिल देव सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते.

कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी 138 चेंडूत 175 धावांची खेळी केली. त्यात 16 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यांना विकेटकिपर सैयद किरमानी यांनी चांगली साथ दिली होती. त्यांनी नाबाद 24 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या या 175 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 8 बाद 266 धावा केल्या होत्या. त्यानंतर झिम्बाब्वेला 235 धावात रोखत सामना जिंकला.

हर्षल गिब्जची 175 धावांची खेळी

दक्षिण अफ्रिकेचा स्टार सलामीवीर हर्षल गिब्जने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याने 111 चेंडूत 175 धावांची खेळी केली. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या सामन्यात 99.5 षटकात तब्बल 872 धावा झाल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया - दक्षिण अफ्रिका द्विपक्षीय मालिकेतील तो पाचवा आणि निर्णायक सामना होता. यामध्ये रिकी पाँटिंगने 105 चेंडूत 165 धावांची खेली केली होती. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात रेकॉर्ड 4 बाद 434 धावा केल्या होत्या.

दक्षिण अफ्रिकेने याच्या प्रत्युत्तरात दमदार फलंदाजी केली. गिब्ज आणि स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 187 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर 32 षटकात 4 बाद 299 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर विकेटकिपर मार्क बाऊचरने नाबाद 50 धावा केल्या आणि संघाला एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला. या सामन्यात गिब्जने 175 धावा ठोकल्या.

इंझमामची विस्फोटक 60 धावांची खेळी

पाकिस्तानचा हेल्दी फलंदाज इंझमाम उल हकने वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात 37 चेंडूत 60 धावा ठोकून एका रात्रीत स्टार झाला होता. 22 वर्षाच्या इंझमामसाठी कर्णधार इमरान खानने निवडसमितीशी पंगा घेतला होता.

वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात इंझमामने आपल्या कर्णधाराचा हा विश्वास सार्थ ठरवला होता. त्याने न्यूझीलंडविरूद्ध 263 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 140 धावांवरून संघाचा डाव सावरत विजय खेचून आणला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT