IND vs PAK World Cup 2023 esakal
क्रीडा

IND vs PAK World Cup 2023 : लाल की काळी माती; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील एक सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात धावांचा पाऊस पडला. डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांनी शतकी खेळी केली. तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फंलादाजी करताना 283 धावा केल्या होत्या. मात्र न्यूझीलंडने हे आव्हान 14 षटके राखूनच पार केलं.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान देखील याच धाटणीची खेळपट्टी असणार आहे. त्यामुळे या हाय व्होल्टेज सामन्यात गोलंदाजांसाठी देखील उत्साहवर्धक वातावरण असेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी आपले दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपची धडाक्यात सुरूवात केली आहे. मात्र 14 ऑक्टोबरला या दोन पैकी एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे.

दरम्यान, दोन्ही संघ अहमदाबादमध्ये पोहचले असून त्यांनी नेट्समध्ये सराव देखील केला. भारतीय गोटातून एक चांगली बातमी आली आहे. शुभमन गिलने डेंग्यूमधून सावरल्यानंतर नेटमध्ये सराव केला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर फलंदाज गाजवणार वर्चस्व?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही धावांसाठी ओळखली जाते. या मैदानावर झालेल्या बऱ्याच सामन्यात फलंदाजांनीच वर्चस्व गातवलं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे इंग्लंड - न्यूझीलंड सामना! या सामन्यात वेगवान गोलंदाजांना सुरूवातीला जास्त स्विंग आणि बाऊन्स मिळाला, मधल्या षटकात फिरकीपटूंनाही देखील मदत मिळाली.

मात्र असे असले तरी देखील फलंदाजांनी देखील चांगला फटकेबाजी केल्याचे दिसून आले. एकंदर नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही सर्वांसाठी काही ना काही ऑफर करते. त्यामुळे सामना नक्कीच रोमांचक होणार.

आकडेवारी काय सांगते?

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत 29 वनडे सामने खेळवले गेले आहेत.

त्यातील प्रथम फलंदाजी करणारा संघ 17 वेळा जिंकला आहे.

दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा जिंकला आहे.

या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 237 धावा होतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT