World Cup 2023 Team India esakal
क्रीडा

World Cup 2023 Team India : टीम इंडियाची जर्सी झाली भगवी... विराट अन् रोहितचा फोटो होतोय व्हायरल

Team India's jersey is saffron...

अनिरुद्ध संकपाळ

World Cup 2023 Team India : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ची आजपासून सुरूवात झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने वर्ल्डकपचा नारळ फुटला आहे. मात्र सर्व क्रिकेट चाहत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. (Team India New Practice Jersey)

दरम्यान, भारतीय संघाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या फोटोमध्ये भारतीय संघ भगव्या रंगाच्या प्रॅक्टिस कीटमध्ये दिसत आहे. यापूर्वी भारतीय संघ फिकट निळ्या आणि काळ्या रंगाचे प्रॅक्टिस कीट वापरत होता. मात्र खास वर्ल्डकपसाठी भारतीय संघ आता भगव्या रंगाचे कीट वापरणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या 2011 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाने देखील त्यावेळी लाल रंगाचे प्रॅक्टिस कीट वापरले होते.

आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड यांच्यात उद्घाटनाचा सामना होत आहे. मात्र या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे बीसीसीआयवर तिकीट विक्रीत मिसमॅनेजमेंट झाल्याचा आरोप देखील होत आहे.

यानंतर 4 ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार अशी बातमी देखील आली होती. मात्र ऐनवेळी बीसीसीआयने असा कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे जाहीर करून टाकले. कॅप्टन्स डेचा कार्यक्रम देखील साधारणच झाला. त्यामुळे बीसीसीआय यंदाच्या वर्ल्डकप आयोजनात गंडलंय असं क्रिकेट चाहत्यांना वाटत आहे.

बीसीसीआने आधी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करताना उशीर केला होता. त्यानंतर सामन्यांच्या ठिकाणांवरून देखील गोंधळ घातला. भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यासाठी संपूर्ण वेळापत्रकच नव्याने तयार करावे लागले होते.

या सर्व गोंधळात तिकीट विक्रीदेखील उशीरानेच सुरू झाली. त्यात बीसीसीआयने ऑनलाईन तिकीटविक्री इतकी क्लिष्ट आणि तापदायक करून ठेवली की चाहत्यांनी याबाबत प्रचंड नराजी व्यक्त केली. आता पहिल्याच सामन्यात चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाणे टाळल्याने बीसीसीआयची चिंता वाढली आहे.

आता तर टीम इंडियाच्या नव्या भगव्या रंगाच्या जर्सीवरून वादंग होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांचे सुपूत्र जय शहा हे बीसीसीआयचे सचिव आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस कीट भगवं करण्याचे राजकीय अर्थ नक्कीच काढले जातील.

(World Cup 2023 Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT