क्‍लागेनफर्ट (जर्मनी) - विश्‍वकरंडकपूर्व आंतरराष्ट्रीय सामन्यात जगज्जेत्या जर्मनीवर विजय मिळविल्याचा आनंद साजरा करताना ऑस्ट्रियाचे खेळाडू. 
क्रीडा

नेऊर परतला; पण जर्मनीची हार

सकाळवृत्तसेवा

क्‍लागेनफर्ट - जर्मनीचा जगद्विख्यात गोलरक्षक मॅन्युअल नेऊर आठ महिन्यांनंतर परतला; परंतु विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सराव सामन्यात तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. ऑस्ट्रियाने गतविजेत्या जर्मनीचा २-१ असा पराभव करून खळबळ उडवून दिली. 

पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रत्येक संघाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रमुख खेळाडूंच्या तंदुरुस्तीचाही आढावा घेतला जात आहे. गतविजेत्या जर्मनीचाही अंतिम २३ खेळाडूंचा संघ जाहीर होणार आहे. त्यासाठी नेऊरची तंदुरुस्ती ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यातून तपासली जाणार होती. या सामन्यात मेसूत ओझीलने जर्मनीला सुरवातीलाच आघाडी मिळवून दिल्यानंतर नेऊर ऑस्ट्रियाच्या मार्टिन हिंटरगेर आणि अलेसांड्रो स्कॉरेफने मारलेले चेंडू रोखू शकला नाही.

सट्टेबाज आणि जाणकारांनी पुन्हा जर्मनीला विजेतेपद मिळवण्याची पसंती दिलेली आहे; पण काही दिवसांत विजेतेपद राखण्याची मोहीम सुरू करण्यापूर्वी झालेला हा पराभव जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोव्ह यांची चिंता वाढवणारा आहे. गेल्या पाच सामन्यांत जर्मनीला विजय मिळवता आलेला नाही. मार्च महिन्यात ब्राझीलकडून ०-१ अशी हार झाल्यानंतर त्यांच्या कामगिरीची घसरण झाली आहे. 

प्रदीर्घ काळानंतर परतणाऱ्या नेऊरने चांगले पुनरागमन केले, असे मत लोव्ह यांनी व्यक्त केले. पराभव चिंता करणारा  आहे. या सामन्यात पहिल्या अर्ध्यात आम्ही चांगला खेळ केला; मात्र दुसऱ्या अर्ध्यात चेंडूवरचा ताबा कमी होत गेला आणि परिस्थितीत अडचणी करून घेतली. आमच्या सर्वच खेळाडूंकडून चुका झाल्या, अशीही खंत लोव्ह यांनी व्यक्त केली. 

ऑस्ट्रियाने ३२ वर्षांनंतर प्रथमच आपल्या शेजारी जर्मनीविरुद्ध हा पहिला विजय मिळवला आहे. व्हिएना येथे ऑक्‍टोबर १९८६ मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियाने जर्मनीला ४-१ असे चकित केले होते. 

ब्राझीलच्या विजयात नेमारचा गोल
या वर्षी सर्वात महागडा ठरलेल्या नेमारच्या दुखापतीची चिंता मिटली. ब्राझीलने रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रोएशियाचा २-० असा पराभव केला. सफाईदार खेळ करणाऱ्या ब्राझीलकडून नेमारने ६९ व्या, तर फिर्मिनो याने भरपाई वेळेत ९३ व्या मिनिटाला गोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Investment : सोनं-चांदीनंतर तांब्याची वेळ? तांब्यात गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा नफा; जाणून घ्या सर्व माहिती

IND VS NZ ODI दरम्यान विराट कोहलीने काय पिऊन तोंड वाकडं केलं? दिग्गज खेळाडू का निवडत आहेत हे पेय, जाणून घ्या

आईला फोन करून सांगते की... घरात कशी वागते गिरीजा ओकची सासू? पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री, म्हणते- किती वेळ झोपायचं...

Latest Marathi News Live Update : परळी - मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी

Gadhinglaj ZP and PS : ‘फॉर्म्युल्याची केमिस्ट्री’ दोन्ही राष्ट्रवादीमध्ये जुळेना,मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय

SCROLL FOR NEXT