World Cup Team India Squad Rishabh Pant News Marathi sakal
क्रीडा

Team India Squad WC 2024 : शेर आया! गेल्या दीड वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूची टीम इंडियात एट्री?

Rishabh Pant in Team India : यावर्षी जूनमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कपला अजून काही दिवस आहे, पण त्याआधीच भारतीय संघासोबत कोणते खेळाडू अमेरिका आणि वेस्ट इंडिजला जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Kiran Mahanavar

World Cup Team India Squad Rishabh Pant : यावर्षी जूनमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कपला अजून काही दिवस आहे, पण त्याआधीच भारतीय संघासोबत कोणते खेळाडू अमेरिका आणि वेस्ट इंडिजला जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, अशी चांगली बातमी समोर आली आहे. तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

2022 च्या अखेरीस ऋषभ पंत एका भीषण रस्ता अपघातात जखमी झाला होता. तेव्हापासून तो सतत क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. परंतु सुमारे 16 महिन्यांनंतर त्याचे मैदानावर पुनरागमन आयपीएलद्वारे झाले, जिथे तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे आणि चांगली कामगिरीही करत आहे.

दरम्यान, तो भारतीय संघातही प्रवेश करू शकतो, अशी बातमी क्रिकबझच्या हवाल्याने समोर आली आहे. तो निवड समितीच्या नजरेत आहे. त्याच्या पुनरागमनाची दाट शक्यता आहे.

ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्यानंतर तो इतर यष्टीरक्षक फलंदाजांपेक्षा खूप पुढे गेला आहे. तसेच, त्याने दाखवलेल्या फिटनेसमुळे तो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही पुनरागमन करू शकतो, असा विश्वास भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना निर्माण झाला आहे. जर तो असाच खेळत राहिला आणि कोणतीही अडचण नसेल तर तो वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये पंतने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये त्याचा स्कोअर 18, 28, 51, 55 आणि 1 असा आहे. म्हणजेच त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याच्या बॅटमधून एकूण 153 धावा झाल्या आहेत. तो त्याच्या जुन्या ओळखीच्या शैलीत चौकार आणि षटकार मारत आहे, तसेच कीपिंग करताना आश्चर्यकारक चपळताही दाखवत आहे.

एका महिन्यात टीम इंडियाची निवड होईल, असे मानले जात आहे. आयपीएलच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या 6 संघांचे खेळाडू आधीच अमेरिकेला रवाना होतील, तर उर्वरित 4 संघांचे खेळाडू नंतर जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT