world test championship sakal
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का; पाकिस्तान अग्रेसर

इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला दुहेरी फटका

Kiran Mahanavar

world test championship: जसप्रीत बुमराच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये पाचव्या कसोटीसह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी गमावली. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतल्यानंतरही टीम इंडियाला यजमान इंग्लंडकडून सात गडी राखून हार सहन करावी लागली. या पराभवामुळे पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशा बरोबरीत राहिली. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाला दुहेरी फटका बसला आहे, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला एका स्थानाचे घसरण झाली आहे. (world test championship points table)

भारताच्या ३-१ अशा फरकाने मालिका जिंकण्याच्या आशांवर पाणी फेरले. त्यामुळे भारताच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुणतालिकेच्या टक्केवारीतही घसरण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये उपविजेते ठरलेल्या भारतीय संघाचा यंदाच्या स्पर्धेतील पुढील मार्ग खडतर असणार आहे एवढे मात्र निश्‍चित. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. पाकिस्तान संघाने भारताची जागा घेतली आहे. आता पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारतीय संघ अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आहे; पण यासाठी टीम इंडियाला स्वत:च्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार असून इतर देशांच्या लढतींच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. भारताला आता दोनच मालिका खेळावयाच्या आहेत.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिका

  • ऑस्ट्रेलिया (३ मालिका) - ७७.७८ टक्केवारी (८४ गुण)

  • दक्षिण आफ्रिका (३ मालिका) - ७१.४३ टक्केवारी (६० गुण)

  • पाकिस्तान (३ मालिका) - ५२.३८ टक्केवारी (४४ गुण)

  • भारत (४ मालिका) - ५२.०८ टक्केवारी (७५ गुण)

  • वेस्ट इंडीज (४ मालिका) - ५० टक्केवारी (५४ गुण)

  • श्रीलंका (४ मालिका) - ४७.६२ टक्केवारी (४० गुण)

  • इंग्लंड (४ मालिका) - ३३.३३ टक्केवारी (६४ गुण)

  • न्यूझीलंड (४ मालिका) - २५.९३ टक्केवारी (२८ गुण)

  • बांगलादेश (५ मालिका) - १३.३३ टक्केवारी (१६ गुण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nursing Student Case : आई-वडील घरी येताच समोर आला धक्कादायक प्रकार; 20 वर्षीय पायलचा दुर्दैवी शेवट, 'नर्सिंग'चे घेत होती शिक्षण

तेजश्रीला लागलं नव्या ट्रेंडचं वेड, सोशल मीडियावर 3D फोटोची भलतीच क्रेझ, फोटो व्हायरल

Solapur Crime : नर्तकी असलेल्या प्रेयसीने भेट न दिल्याने माजी उपसरपंचाने गोळी झाडून संपविले जीवन; नर्तकीविरुद्ध गुन्हा दाखल

Fake Job Scam : बोगस नोकरीची मुलाखत चक्क मंत्रालयात, नागपुरातील तरुणाकडून लाखो रुपये उकळले...धक्कादायक प्रकरण समोर!

Navid Mushrif : नविद मुश्रीफांना शौमिका महाडिकांनी म्हटलं पळपुटे; बहीण-भावाच्या नात्यात दुरावा?

SCROLL FOR NEXT