निखत झरीन, नीतू घंघास sakal
क्रीडा

Boxing : जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्ण! नीतू, स्विटी जगज्जेते

भारताच्या नीतू वघास व स्विटी बुरा या महिला खेळाडूंनी शनिवारचा दिवस गाजवला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या नीतू वघास व स्विटी बुरा या महिला खेळाडूंनी शनिवारचा दिवस गाजवला. नीतू व स्विटी या दोघींनी पहिल्यांदाच जगज्जेतेपदावर नाव कोरले. मायदेशात सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत दोघींनी आपापल्या गटात विजेता होण्याचा मान संपादन केला.

नीतू हिने ४८ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या लुतसाईखान अल्तांतसेतसेग हिच्यावर ५-० असा विजय साकारला. कझाकस्तानची लुतसाईखान ही दोन वेळा आशियाई स्पर्धेची ब्राँझपदक विजेती होती; मात्र नीतूच्या आक्रमक खेळासमोर तिचा निभाव लागला नाही. नीतूच्या दमदार ठोशांसमोर लुतसाईखान निष्प्रभ ठरली. पहिल्या दोन फेल्यांमध्ये नीतू हिच्याकडे ५० आणि ३-२ अशी आघाडी होती. यावरूनच ही लढत एकतर्फी झाल्याचे प्रकर्षाने दिसून येते.

स्विटी आणि चीनच्या बॅग लिना यांच्यामध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये स्विटीकडे ३-२ अशी आघाडी होती. तिसऱ्या फेरीमध्ये स्विटीने आणखी चांगली कामगिरी केली. यामध्ये ती ४-१ अशी पुढे गेली. या लढतीचा निकाल रिव्यूनंतर लावण्यात आला. स्विटी हिने ८१ किलो वजनी गटात ४-३ अशा फरकाने ही लढत आपल्या नावावर केली.

दरम्यान, टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक जिंकणाऱ्या इटलीच्या आयम टेस्टा हिने ५७ किलो वजनी गटात पहिल्यांदाच विश्वविजेती होण्याचा मान संपादन केला. तिने कझाकस्तानच्या कॅरिना इब्राहिमोवा हिला ५-० असे पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. मागच्या स्पर्धेत तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

भारताच्या जगज्जेतेपदात वाढ

याआधीपर्यंत भारताच्या पाच महिला बॉक्सर्सनी जगज्जेतेपद पटकावले होते. यामध्ये मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल, लेखा केसी व निखत झरीन यांचा समावेश होता. आता या यादीत आणखी दोन नावांचा समावेश झाला आहे. नीतू धंघास व स्विटी बुरा यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत भारतासाठी मोलाची कामगिरी केली.

जगज्जेतेपद पटकावल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अंतिम लढतीआधी आक्रमक खेळ करण्याचा विचार केला होता. अन् त्याचप्रमाणे रिंगणात खेळ केला. याप्रसंगी माझ्या कुटुंबासह सर्व प्रशिक्षकांचेही आभार मानते. प्रशिक्षक भास्कर सरांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे, त्यांचेही योगदान मोलाचे आहे. • नीतू धंघास, जगज्जेती, भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Discharge : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उचलले! 6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू; कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

‘मुझको राणाजी माफ करना…’ 30 वर्षांपूर्वीच्या गाण्याचा रिमेक, ममता कुलकर्णी म्हणाल्या...'त्यावेळी दोन दिवसांची रिहर्सल आणि..'

Latest Marathi News Live Update : ओबीसी आरक्षणाचा पेच सुटणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच; १२ हजार ग्रामपंचायतींसह २० जिल्हा परिषदांसाठी तयारी सुरू

Nagpur Extortion Case: दोन लाखांच्या खंडणीसाठी हल्ला; तोतया पोलिसासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur Crime: आयुष पुगलियाची हत्या करणाऱ्यास जन्मठेप; मृतक गाजलेल्या कुश कटारिया हत्याकांडातील आरोपी

SCROLL FOR NEXT