Bray Wyatt Died ESAKAL
क्रीडा

Bray Wyatt Died: WWE चॅम्पियन ब्रे व्हॅट्ट याचे निधन; हर्ट अटॅकमुळे वयाच्या 36 व्या वर्षी जगाचा निरोप

सकाळ डिजिटल टीम

Bray Wyatt Died

नवी दिल्ली- डब्लूडब्लूई World Wrestling Entertainment (WWE) चा प्रसिद्ध चॅम्पियन खेळाडू ब्रे व्हॅट्ट Bray Wyatt याचे निधन झाले आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. कंपनीचा प्रमुक कंटेट ऑफिसर आणि माजी चॅम्पियन पॉल उर्फ ट्रिपल एच याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याने एक्स वर पोस्ट केली आहे.

ट्रिपल एच याने पोस्टमध्ये म्हटलंय की, मला आत्ताच फोन आला आणि कळवण्यात आलं मी आमचा साथीदार आता जगात नाही. विंधम रोटूंडा Windham Rotunda उर्फ ब्रे व्हॅट्ट WWE कुटुंबातील एक सदस्य होता, पण त्याने अचानकपणे एक्झिट घेतली आहे. ही खूप दु:खद घटना आहे. आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. सर्वांनी ब्रे व्हॅट्टचा खासजीपणाचा आदर करावा.

ESPN च्या माहितीनुसार, ब्रे व्हॅट्टचे खरं नाव विंधम रोटूंडा असं आहे.गेल्या काही महिन्यांपासून तो WWE पासून अलिप्त होता. काही आरोग्यसंबंधी अचडणींमुळे तो बाहेर पडला होता. तो २००९ पासून WWE सोबत होता. २०२१ मध्ये त्याची WWE मधून काही अज्ञात कारणामुळे मुक्तता करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा तो WWE जॉईन झाला होता.

TMZ नुसार, ब्रे व्हॅट्ट तीनवेळा WWE चा विजेता होता. यात एकदा WWE चॅम्पियन आणि दोनवेळा तो WWE युनिव्हर्सल चॅम्पियन होता. WWE मधून त्याने २०१८ आणि २०१९ मध्ये ब्रेक घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा नव्या रुपात WWE मध्ये आला होता. त्याचा निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अवघ्या ३६ व्या वर्षी त्याने आयुष्यातून एक्झिट घेतल्यामुळे अनेकांचा या बातमीवर विश्वास बसत नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT