delhi capitals
delhi capitals 
क्रीडा

WPL 2023 : दिल्लीचा संघ थेट अंतिम फेरीत! मुंबई इंडियन्स अन् यूपी संघात एलिमिनेटरचा सामना

सकाळ ऑनलाईन टीम

WPL 2023 Delhi Capitals : दिल्ली कॅपीटल्स संघाने मंगळवारी यूपी वॉरियर्स संघावर ५ विकेट व १३ चेंडू राखून विजय मिळवला आणि महिलांच्या पहिल्यावहिल्या प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने सहाव्या विजयासह १२ गुणांनिशी सरस नेट रनरेटच्या जोरावर पहिले स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सला दुसऱ्या व यूपी वॉरियर्सला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

मुंबई- यूपी वॉरियर्स यांच्यामध्ये येत्या शुक्रवारी एलिमिनेटर लढत होणार आहे. या लढतीतील विजेता संघ २६ मार्च रोजी जेतेपदाच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करील.

दरम्यान, याआधी दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्या- चा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सचा संघ इलिमिनेटर लढतीत खेळणार हे नक्की होते. पण त्या लढतीआधी आत्मवि- श्वास मिळवणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवून त्यांचा संघ मैदानात उतरला. कर्णधार एलिसा हिली व श्वेता सेह- रावत या जोडीने ३० धावांची भागीदारी करत समाधानकारक सुरुवात केली. राधा यादवने श्वेताला १९ धावांवर बाद केले.

एलीस कॅप्सी हिने ३६ धावा करणाऱ्या हिलीला बाद केले. त्यानंतक ताहलिया मॅग्रा हिने स्वबळावर यूपी वॉरियर्सला १३८ धावसंख्या गाठून दिली. तिने ३२ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५८ धावांची खेळी केली. सिमरन शेख (११ धावा), किरण नवगिरे (२ धावा), दीप्ती शर्मा (३ धावा), सोफी एक्लेस्टोन (०) यांच्याकडून निराशा झाली. एलिस कॅप्सी हिने २६ धावा देत ३ फलंदाज बाद केले. राधा यादव हिने २८ धावा देत २ फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT