wpl-2023-rcb-vs-dc-shafali verma-meg lanning first wicket partnership 24 fours 4 sixes struck 162  
क्रीडा

24 चौकार, 4 षटकार... ठोकल्या 162 धावा! शेफाली अन् कर्णधार मेग लॅनिंगचा WPLमध्ये कहर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना शेफाली वर्मा अन् कर्णधार मेग लॅनिंगने चांगलंच धुतले

Kiran Mahanavar

WPL 2023 RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीर मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अप्रतिम फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी वेगवान फलंदाजी करताना पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंनी मिळून 24 चौकार आणि 4 षटकार ठोकले. पॉवरप्ले किंवा मधली षटके, शेफाली आणि लॅनिंग यांनी आरसीबीला 14.5 षटकांपर्यंत अडचणीत आणले.

शेफाली वर्माने अवघ्या 45 चेंडूत 84 धावा केल्या. त्याचवेळी कॅप्टन लॅनिंगने 43 चेंडूत 72 धावांची खेळी केली. शेफालीचा स्ट्राइक रेट 186 पेक्षा जास्त होता, तर लॅनिंगने 167 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. या दोन खेळाडूंच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीविरुद्ध 223 धावा केल्या.

शेफाली वर्मा आणि लॅनिंग यांनी पहिल्याच चेंडूपासून आरसीबीवर दडपण आणले. या दोन्ही खेळाडूंनी पॉवरप्लेमध्ये 57 धावा जोडल्या. हे दोन्ही खेळाडू इथेच थांबले नाहीत. दोघांनी केवळ 9.4 षटकांत धावसंख्या 100 च्या पुढे नेली. शेफाली वर्माने पहिले अर्धशतक पूर्ण केले. या खेळाडूने 31 चेंडूत हा आकडा गाठला. कॅप्टन लॅनिंगने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. लॅनिंग-शेफालीने 13.4 षटकांत संघाची धावसंख्या 150 पर्यंत नेली.

शेफाली वर्मा या WPL मध्ये शतक झळकावणारी पहिली खेळाडू बनू शकली असती पण तिला तसे करता आले नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिने आपली विकेट गमावली. यामुळे शेफाली खूपच निराश दिसत होती. तो म्हणाला, 'माझे 100 चुकले. मला थोडं वाईट वाटलं. मेग लॅनिंगसोबत खेळायला आनंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT