Bajrang Punia Wrestler Protest esakal
क्रीडा

Bajrang Punia : मी पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत पाठवतोय... बजरंग पुनियानं उचललं टोकाचं पाऊल

साक्षीच्या कुस्ती सोडण्याच्या घोषणेनंतर आता बजरंग पुनियाची पुरस्कार वापसी

अनिरुद्ध संकपाळ

Bajrang Punia Return Padma Shri Award : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांची निवड झाली. त्यानंतर आंदोलक कुस्तीपटूंनी यावर टोकाचे पाऊल उचलले आहे.

साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली तर आता बजरंग पुनियाने प्रतिष्ठित पद्म पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परत पाठवत असल्याचे जाहीर केले. त्याने ही माहिती ट्विट करून दिली. त्यानंतर तो पुरस्कार परत करण्यासाठी जात असताना त्याला पोलिसांनी कर्तव्य पथवर अडवले.

बजरंग पुनियाने पंतप्रधानांच लिहलं पत्र

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध भारताच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप करत केलेल्या आंदोलनाला बजरंग पुनियाने शेवटपर्यंत पाठिंबा दर्शवला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून संजय सिंह यांची निवड झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं. हे पत्र सोशल मीडियावरून शेअर केलं.

या ट्विटला मी माझा पद्मश्री पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत करत आहे. सांगायला हे फक्त माझं पत्र आहे. हे माझं स्टेटमेंट देखील आहे.'

तीन पानाच्या या भल्यामोठ्या पत्रात बजरंगने आंदोलनाचा घटनाक्रम, सरकारमधील मंत्र्यांची आश्वासने, गृहमंत्र्यांची भेट आणि त्यानंतर झालेली WFI ची निवडणूक या सर्वांचा उल्लेख केला आहे.

याचबरोबर ब्रिजभूषण यांच्या दबदबा हैं दबदबा रहेगा या वक्तव्याचा देखील उल्लेख करत बजरंगने सरकारने दिलेले पुरस्कार कसे बोचत आहेत हे सांगितले.

बजरंगला कधी मिळाला होता पद्मश्री?

बजरंग पुनियाला 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. याच वर्षी बजरंग पुनियाला खेल रत्न पुरस्कार देखील मिळाला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT