Wrestlers protest
Wrestlers protest 
क्रीडा

Wrestlers protest : 'I support Bajrang Dal...' आंदोलनादरम्यान बजरंग पूनियाच्या पोस्टने उडाली खळबळ!

Kiran Mahanavar

Wrestlers Protest : नवी दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन गेल्या 16 दिवसांपासून सुरू आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलन करत आहे.

ब्रिजभूषण यांना अटक करावी, अशी पैलवानांची मागणी आहे. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा. दरम्यान ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. बजरंगने निषेधादरम्यान कर्नाटक निवडणुकीसंदर्भात इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि नंतर गदारोळानंतर ती डिलीट पण करून टाकली.

बजरंग पुनियाच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करण्यात आली जी चाहत्यांना फारशी आवडली नाही. स्टोरीत हनुमानाचा फोटो होता आणि त्यावर 'मी बजरंगी आहे, मी बजरंग दलाला समर्थन देतो, जय श्री राम' असे लिहिले होते.

ट्विटरवर लोक या पोस्टचा कर्नाटक निवडणुकीशी संबंध जोडताना दिसत आहेत. कर्नाटकात बजरंग दलाच्या नावाने राजकीय पक्ष प्रचार करत आहेत. लोक म्हणाले की बजरंग पुनिया हा ढोंगी आहे जो स्टेजवर म्हणतो की तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि नंतर अशी स्टोरी शेअर करतो. बजरंग ट्रोल होताच त्याने ही स्टोरी डिलीट केली. बजरंगचे अकाउंट हॅक झाल्याचेही अनेकांनी सांगितले.

खुद्द बजरंगने याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. याआधी बजरंगची पत्नी संगीता फोगट हिलाही पीएम मोदींविरोधात एक स्टोरी शेअर केल्याने ट्रोल करण्यात आले होते.

Wrestlers protest

बजरंग अजूनही संपावर असून महिला खेळाडूंना न्याय देण्याची मागणी करत आहे. रविवारी अनेक शेतकरी नेते, पंचायत आणि संघटनांनी जंतरमंतर येऊन खेळाडूंना पाठिंबा दिला. 15 दिवसांचा अवधी देत ​​त्यांनी या कालावधीत तपासात कोणताही निर्णय न झाल्यास मोठा निर्णय घेऊ असे सांगितले. सतत प्रसारमाध्यमांसमोर बोलणारा बजरंग हा या धरणे आंदोलनाचा मोठा चेहरा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

Moon Express: चंद्राबाबत मोठी बातमी! मून एक्स्प्रेसची तयारी सुरू, नासा चालवणार ट्रेन

PBKS vs RCB Live Score : आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघ लावणार जोर

SCROLL FOR NEXT