Wrestler Protest FIR  esakal
क्रीडा

Wrestler Protest FIR : शारीरिक सुखाची मागणी, असभ्य स्पर्श... FIR मध्ये बृजभूषण यांच्याविरूद्ध आहेत 'हे' 6 आरोप

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest 2 FIR 10 Complaints : भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक छळाचा आरोप करत आंदोलन छेडले होते. मात्र तरी देखील बृजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल झाली नव्हती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण यांच्याविरूद्ध दोन एफआयआर आणि 10 तक्रारी दाखल झाल्या आहेत. इंडिया टूडेने दिल्लीच्या कनौट प्लेस पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन एफआयआरमधील माहिती प्रसिद्ध केली आहे.

एफआयआरनुसार बृजभूषण यांच्याविरूद्ध शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. याचबरोबर त्यांच्याविरूद्ध जवळपास लैंगिक शोषणाच्या 10 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरूद्ध महिला कुस्तीपटूंना असभ्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रत्न करणे, त्याचा हात मुलींच्या छातीवर ठेवल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. बृजभूषण यांच्याविरूद्ध 21 एप्रिलला तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर त्यांच्याविरूद्ध 2 एफआयआर या 28 एप्रिलला दाखल करण्यात आल्या. या एफआयआर 354, 354 अ, 354 ड आणि 34 कलमाअंतर्गत दाखल करण्यात आल्या आहेत. या कलमाअंतर्गत जर शिक्षा झाली तर तीन वर्षाचा तुरूंगवास होऊ शकतो.

पहिली एफआयआर ही सहा ऑलिम्पिक महिला कुस्तीपटूंच्या आरोपांवरून दाखल करण्यात आली आहे. तर दुसरी एफआयआर ही अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या आरोपांवरून दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीत बृजभूषण शरण सिंह यांनी त्या मुलीला फोटो काढण्याच्या बहाण्याने घट्ट पकडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बृजभूषण यांनी या मुलाचा खांदा दाबला आणि चुकीच्या पद्धतीने तिला मुद्दाम स्पर्श केल्याचा देखील आरोप आहे. अल्पवयीन मुलीने WFI अध्यक्षांना स्पष्टपणे तिचा पाठलाग न करण्यास सांगितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.

बृजभूषण यांच्याविरूद्धच्या तक्रारी

1 - हॉटेलमध्ये डिनर करत असताना WFI प्रशिक्षकाने अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप आहे. सिंह यांनी तिच्या खांद्याला, गुडघ्याला आणि तळहाताला स्पर्श केला. त्यांनी श्वास घेण्याच्या पद्धती सांगण्याच्या बहाण्याने महिला कुस्तीपटूच्या छाती, पोटाला स्पर्श केला.

2 - बृजभूण यांच्याविरूद्ध महिला कुस्तीपटूचा टी शर्ट ओढणे आणि छातीला हात लावण्याची, स्वतःकडे बळजबरीने खेचल्याला आरोप आहे.

3 - बृजभूषण यांच्याविरूद्ध कुस्तीपटूला मिठी मारणे आणि लाच देण्याचा प्रयत्न कल्याचा देखील आरोप आहे.

4 - भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरूद्ध दुसऱ्या एका तक्रारीत देखील श्वास घेण्याची पद्धत समजावताना अयोग्यरित्या पोटाला हात लावल्याचा देखील आरोप आहे.

5 - दुसऱ्या एका तक्रारीत महिला कुस्तीपटूने बृजभूषण यांनी ती एका लाईनमध्ये उभी असताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला. ज्यावेळी बृजभूषण यांनी तिचा खांदा पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती बाजूला झाली असे या कुस्तीपटूने सांगितले.

6 - अजून एका महिला कुस्तीपटूने सिंह यांच्यावर त्यांनी तिच्या खांद्यावर हात टाकल्याचा आरोप केला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT