Wrestler Protest IOC esakal
क्रीडा

Wrestler Protest IOC : तुमच्याकडे फक्त 45 दिवस... कुस्तीपटूंच्या समर्थनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मैदानात

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest International Olympic Committee : भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन केले. मात्र दिल्ली पोलिसांनी हे कुस्तीपटूंना जंतर मंतरवरून फरफटत नेले अन् आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. भारताच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच हा प्रकार घडल्याने देशभरातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

आता या प्रकरणात जागतिक ऑलिम्पिक समितीने उडी घेतली असून दिल्ली पोलिसांनी पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकीबद्दल कडक शब्दात फटकारले आहे. IOC ने आपल्या वक्तव्यात म्हटले की, 'भारतीय कुस्तीपटूंना मिळालेली वागणूक ही अत्यंत वाईट आणि हादरवणारी होती. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांची स्थानिक कायद्याच्या चौकटीत बसणारी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी IOC मागणी केली.'

याचबरोबर आयओसीने भारतीय कुस्ती महासंघाला 45 दिवसात निवडणूक घेतली नाही तर बंदी घालण्याची धमकी देखील दिली आहे.

आयओसीने भारतीय कुस्ती महासंघावर कारवाई करण्याबाबत देखील वक्तव्य केले. 'जेव्हापासून कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत तेव्हापासून आम्ही जागतिक कुस्ती संघटनेच्या संपर्कात आहोत. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात आयओसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत राहून जागतिक कुस्ती संघटनेच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचे समर्थन करते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT