Wrestler Sushil Kumar esakal
क्रीडा

कुस्तीपटू सुशील कुमारच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांचा विरोध

सकाळ डिजिटल टीम

याआधी सत्र न्यायालयानं सुशील कुमारचा जामीन फेटाळून लावला होता.

छत्रसाल स्टेडियमवरील हत्याकांडप्रकरणी (Chhatrasal Stadium Case) कुस्तीपटू सुशील कुमारच्या (Wrestler Sushil Kumar) जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उच्च न्यायालयात विरोध केलाय. सुशीलला आता जामीन देणं योग्य नसल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हंटलंय की, सुशील कुमार हा छत्रसाल स्टेडियमवर घडलेल्या या घृणास्पद घटनेचा कथित सूत्रधार आहे. तो ग्लोब ट्रॉटर असून त्याला जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो. यासोबतच दिल्ली पोलिसांनी कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितलं की, या प्रकरणातील साक्षीदार सुशील आणि त्याच्या साथीदारांना घाबरत असून एका साक्षीदारानं न्यायालयात संरक्षणाची मागणी केलीय.

कुस्तीपटू सागर धनखर हत्या प्रकरणात (Wrestler Sagar Dhankar Murder Case) सुशील कुमार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुशील कुमार हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून त्यानं त्याच्या साथीदारांसह हा कथित कट रचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमारनं हरियाणा (Haryana) आणि दिल्लीतून माणसं व शस्त्रं आणून पीडितांचं अपहरण करून ही घटना घडवून आणली. याप्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आरोपी सुशील कुमार हा एक अतिशय प्रभावशाली आणि हायप्रोफाईल व्यक्ती आहे, जो साक्षीदारांना धमकावू शकतो, त्यामुळं त्याला जामीन देता येणार नाही, असं नमूद करण्यात आलंय.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे. याआधी सत्र न्यायालयानंही सुशील कुमारचा जामीन फेटाळून लावला होता. सुशील कुमारवर 4 मे 2021 च्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर धनखर आणि त्याच्या साथीदारांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमुळं सागरचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी 23 मे रोजी सुशील कुमारला अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

SCROLL FOR NEXT