Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh esakal
क्रीडा

Wrestlers Protest : मी जर राजीनामा दिला तर कुस्तीपटूंचे... एवढं होऊनही बृजभूषण सिंहांना खुर्ची सुटेना

अनिरुद्ध संकपाळ

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh : भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत रस्त्यावर आंदोलनाला बसले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलीसांनी भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली. मात्र तरी देखील बृज भूषण शरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे.

शुक्रवारी दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली. यानंतर बृजभूषण शरण सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र मी काही गुन्हेगार नाही.'

'जर मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ मी कुस्तीपटूंचे आरोप मान्य केले असं होईल. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने तीन सदस्यांची समिती नेमली आहे. येत्या 45 दिवसात निवडणुका होतील. निवडणुकांनंतर माझा कार्यकाळ संपुष्टात येईल.'

बृजभूषण पुढे म्हणाले की, 'प्रत्येक दिवशी हे कुस्तीपटू एक वेगळी मागणी घेऊन येत आहेत. त्यांनी एफआयआरची मागणी केली एफआयआर दाखल झाली. आता ते मला जेलमध्ये पाठवा आणि राजीनामा घ्या अशी मागणी करत आहेत. मी माझ्या मतदार संघातील लोकांमुळे खासदार आहे विनेश फोगाटमुळे मी खासदार झालो नाही. सध्या फक्त एक कुटुंब आणि आखाडा आंदोलन करत आहे. हरियाणातील 90 टक्के कुस्तीपटू माझ्या बाजूने आहेत.'

'या आंदोलनापूर्वी ते माझे गुणगाण करत होते, त्यांच्या लग्नसमारंभात बोलवत होते. माझ्यासोबत फोटो काढत होते. माझे आशीर्वाद घेत होते. त्यांनी 12 वर्षे कोणत्याही पोलीस ठाण्यात, क्रीडा मंत्रालयाकडे किंवा फेडरेशनकडे लैंगिक अत्याचाराची तक्रार केली नव्हती.'

आज सकाळी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांना जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली होती. यावर बृजभूषण म्हणाले की, 'मी सुरूवातीपासूनच सांगत होतो की काही उद्योगपती आणि काँग्रेस या आंदोलनाच्या पाठीमागे आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver New Rule: चांदीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आयात शुल्क वाढीनंतर आता नवा नियम लागू; किमती वाढणार?

पुण्यात २५ वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन, अधिक मासात अंगठी, फ्लॅटसाठी ३ लाखाची मागणी; सासरच्यांवर गंभीर आरोप

'मी कधीच कुणाचं ऐकत नसते' प्राजक्ता माळीने PM मोदींचही न ऐकता आपलंच खर केलं, नक्की काय झालं?

Latest Marathi News Live Update : म्यानमार राष्ट्राध्यक्षांची मुंबई विमानतळाला भेट

Maharashtra Police: एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, महाराष्ट्र पोलिसांचा दणका; २० कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT