Wrestlers Protest 
क्रीडा

Wrestlers Protest : पैलवानांच्या आंदोलनात दुपारी शेतकऱ्यांनी तोडले बॅरिकेड्स, अन् सायंकाळी पोलिसांनी...

Kiran Mahanavar

Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन गेल्या 16 दिवसांपासून सुरूच आहे. कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सोमवारी पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी त्यांनी कुस्तीपटूंच्या प्रात्यक्षिकापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. आता अशा प्रकारे बॅरिकेड्स कोणीही तोडू शकणार नाही, यासाठी दिल्ली पोलिसांनीही बंदोबस्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी जंतरमंतरवर लावलेल्या बॅरिकेड्सचे वेल्डिंग सुरू केले.

WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. सोमवारी शेतकरी पैलवानांच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर पोहोचले. येथे त्यांनी दिल्ली पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स हटवले. या बॅरिकेड्सवर चढून शेतकरी कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या निदर्शनास पोहोचले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये शेतकरी बॅरिकेड्सवर चढताना, बॅरिकेड्स ओढताना आणि हटवल्यानंतर पुढे जाताना दिसत आहेत. डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की, काही शेतकरी आंदोलनच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी घाईत असताना ही घटना घडली. शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी नेण्यासाठी बॅरिकेड्स हटवण्यात आले असून तेथील सभा शांततेत पार पडली.

जंतरमंतरवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये कोणतीही हाणामारी झाली नसल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विट केले की, सर्वांना विनंती आहे की, फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. आंदोलकांची जंतरमंतरवर सोय केली जात आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी DFMD द्वारे प्रवेश दिला जात आहे. कृपया शांत राहा आणि कायद्याचे पालन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT