Wrestlers Protest Updates 
क्रीडा

Wrestlers Protest : "स्वतःला सोडवण्यासाठी तिने ब्रिजभूषणला ढकललं अन्.." प्रत्यक्षदर्शी असलेल्या इंटरनॅशनल रेफ्रीची साक्ष

Kiran Mahanavar

Wrestlers Protest Updates : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. भाजप खासदाराच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करत आहे. दरम्यान, याआधी अल्पवयीन कुस्तीपटू पीडितेच्या वडिलांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. पण तिच्या वडिलांने आपले वक्तव्य बदलले आहे.

त्याचवेळी या प्रकरणातील एका तक्रारदाराने सांगितले होते की, मार्च 2022 मध्ये लखनऊमध्ये आशियाई चॅम्पियनशिप ट्रायल्सच्या शेवटी टीम फोटो क्लिक करत असताना ब्रिज भूषण यांनी माझ्या नितंबांवर हात ठेवला, त्यानंतर मी लगेच हलवण्याचा प्रयत्न केला.

2007 पासून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच, ब्रिजभूषण आणि तक्रारदार यांच्यापासून काही फूट दूर उभे असलेले जगबीर सिंग यांनी दिल्ली पोलिसांसमोर दिलेल्या साक्षीत कुस्तीपटूच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना जगबीर सिंग यांनी या फोटोचा संदर्भ देत सांगितले की, दिल्ली पोलिसांनी त्यांना याबद्दल विचारले होते.

जगबीर सिंग म्हणाले, मी त्यांना ब्रिजभूषण यांच्या शेजारी उभे असलेले पाहिले. तिने स्वत:ला सोडवले, ढकलले, बडबड केली आणि निघून गेली. ती WFI अध्यक्षांच्या शेजारी उभी होती पण नंतर समोर आली. ही महिला कुस्तीपटू कशी प्रतिक्रिया देत होती हे मी पाहिले आणि ती अस्वस्थ होती. मी त्याला काही करताना पाहिलं नाही पण, पैलवानांना हात लावायचा आणि इकडे ये, इथे उभं राहा म्हणायचे. त्या दिवशी फोटो सेशन करताना काहीतरी गडबड झाल्याचे तक्रारकर्त्याच्या वागण्यावरून स्पष्ट होते.

एफआयआरनुसार महिला कुस्तीपटूनं आपल्या तक्रारीत म्हटले की, “मी सर्वात उंच कुस्तीपटूंपैकी एक असल्याने मला शेवटच्या रांगेत उभे राहावे लागले. मी शेवटच्या रांगेत उभा असताना इतर पैलवान आपली पोझिशन घेतील याची वाट पाहत असताना आरोपी ब्रिजभूषण सिंह माझ्याजवळ येऊन उभा राहिला.

मला अचानक माझ्या पार्श्वभागावर हात जाणवला. मी लगेच मागे वळून पाहिलं तो हात आरोपी ब्रिजभूषण सिंह यांचा होता. आरोपीच्या अनुचित स्पर्शापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी ताबडतोब त्या ठिकाणाहून लांब जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने बळजबरीने माझा खांदा धरला. मी कसेतरी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवले. मी टीमसोबत फोटो क्लिक करणे टाळू शकत नसल्यामुळे, मी आरोपींपासून दूर, पुढच्या रांगेत बसण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT