Wriddhiman Saha journalist threats Issue BCCI form Investigation Committee esakal
क्रीडा

साहा पत्रकार धमकी प्रकरण; BCCI ने स्थापन केली चौकशी समिती

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) काही दिवसांपूर्वी त्याला एका पत्रकाराने मुलाखत देण्यावरून धमकावले (Journalist Threats) असल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावर पत्रकाराबरोबरचे चॅट शेअर करत वृद्धीमान साहाने नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाची बीसीसीआयने (BCCI) गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती (Investigation Committee) स्थापन केली आहे.

या चौकशी समितीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, खजिनदार अरूण धुमल आणि वरिष्ठ काऊन्सिल मेंबर प्रभतेज सिंह भाटिया यांचा समावेश आहे. ही समिती पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीला या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.

वृद्धीमान साहा हा बीसीसीआयचा केंद्रीय करारात सामिल असलेला खेळाडू आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ट्विट करून पत्रकाराने मुलाखतीसाठी धमकी दिल्याचा आरोप केला होता. यावेळी त्याने त्या पत्रकाराचे नाव जाहीर केले नव्हते. वृद्धीमान साहाने श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly), प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्याबरोबरचे वैयक्तिक संभाषण सार्वजनिक केले होते. यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली होती.

दरम्यान, साहाला पत्रकाराने धमकी दिल्याच्या प्रकरणावर भारताचे माजी खेळाडू रवी शास्त्री, पार्थिव पटेल आणि विरेंद्र सेहवाग यांनी कथित पत्रकारावर टीका केली होती. याचबरोबर भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या संघटनेने देखील या घटनेचा निषेध केला होता. आणि बीसीसीआयच्या याप्रकरणाची चौकशी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

त्यानंतर वृद्धीमान साहाने जरी बीसीसीआयने त्या पत्रकाराचे नाव विचारले तरी मी त्याचे नाव सांगणार नाही असा पवित्रा घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT