Wriddhiman Saha CAB esakal
क्रीडा

बंगाल सोडण्याबाबत साहा बोलला; 'त्या' व्यक्तीच्या वक्तव्यामुळे....

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : भारताचा विकेटकिपर बॅट्समन वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) नुकतेच बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे (CAB) दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळावे यासाठी अर्ज केला आहे. जवळपास 15 वर्षे पश्चिम बंगालच्या रणजी संघाकडून खेळणारा वृद्धीमान साहा आता बंगालचा संघ सोडणार आहे. बंगाल यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहचला आहे. साहाच्या संघातील समावेशाबाबत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी वेळोवेळी बोलत आले आहेत. मात्र साहाने आतापर्यंत कोणतेही भाष्य केले नव्हते. अखेर वृद्धीमान साहाने या संपूर्ण प्रकणावर पहिल्यांदाच भाष्य केले.

वृद्धीमान साहाने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव देबब्रत दास (Debabrata Das) यांनी केलेल्या वक्तव्याने आपल्याला दुःख झाल्याचे सांगितले. दास यांनी वृद्धीमान साहाच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत साहा म्हणाला 'बंगालकडून इतकी वर्षे खेळल्यानंतरही मला यातून जावे लागत असल्याने माझ्या मनात देखील दुःखी भावना निर्माण झाली होती.' वृद्धीमान साहाने हे वक्तव्य स्पोर्ट्सस्टारशी बोलताना केले.

साहा पुढे म्हणाला की, 'लोक तुमच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित करतात त्यावेळी ते निराशाजनक असते. एक खेळाडू म्हणून मी यापूर्वी अशा गोष्टींचा सामना केला नव्हता. पण, आता हे होत आहे. मला आता पुढं गेलं पाहिजे.' दरम्यान, साहाला पुढच्या हंगामात काय करणार असे विचारले असता त्याने मोघम उत्तर दिले.

तो म्हणाला, 'मी खूप लोकांशी बोललो आहे. मात्र अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुढचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून खूप कालावधी आहे.' वृद्धीमान साहा यंदाच्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळला होता. त्याने देखील संघाच्या विजयात आपले योगदान दिले. त्याने 11 सामन्यात 317 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT