WTC Final 2023 Day 2 Ajinkya Rahane esakal
क्रीडा

WTC Final 2023 Day 2 : गोलंदाज सुधारले, फलंदाज चुकले; कमिन्सचा स्मार्टपणा अन् कांगारू फायद्यात

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final 2023 Day 2 Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवसाची चूक पुन्हा न करत टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 500 धावांच्या आत संपवण्यात यश मिळवले. भारतीय गोलंदाजांनी 3 बाद 361 वरून कांगारूंचा डाव 469 धावात संपुष्टात आणला.

ऑस्ट्रेलियन फलंदाज फलंदाजी करत असताना खेळपट्टी फलंदाजीला पोषक वाटत होती. या खेळपट्टीवर भारताचे स्टार फलंदाज देखील मोठी खेळी करतील अशी अपेक्षा होती. मात्र कांगारूंच्या नियंत्रित माऱ्यासमोर भारताचे रथी महारथी निष्प्रभ ठरल गेले.

भारतीय गोलंदाज देर आए दुरुस्त आए

भारतीय गोलंदाजांनी अखेर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात झुंजारपणा दाखवत गोलंदाजी केली. त्यांनी स्टीव्ह स्मिथ आणि इतर फलंदाजांना ड्राईव्ह करण्यासाठी उकसवले अन् त्यांची विकेट घेतली. तर 163 धावा ठोकणाऱ्या ट्रेविस हेडच्या वर्मावर बोट ठवले. त्याला सिराजने बाऊन्सरवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी 327 धावा दिल्या होत्या. मात्र त्यानंतर फक्त 142 धावात कांगरूंचे 7 फलंदाज बाद करत आपली चूक सुधारली.

डोळ्यात तेल घालून फलंदाजी करणे गरजेचे

जरी ऑस्ट्रेलियाने 469 धावांचा डोंगर उभा केला असला तरी या खेळपट्टीवर एकादुसरा चेंडू हा टप्पा पडल्यानंतर जोरात आत येत होता. तसेही इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूवर तुम्हाला संपूर्ण दिवसभर डोळ्यात तेल घालून फलंदाजी करावी लागते. मात्र हीच गोष्ट भारतीय संघातील टॉप ऑर्डरला करता आली नाही.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलने जवळपास सहाच्या रनरेटने धावा करण्यास सुरूवात केली. पहिल्या 6 षटकातच 30 धावांपर्यंत मजल मारली. मात्र रोहित टप्पा पडून जोरात आत येणाऱ्या चेंडूवर बाद झाला. तीच गत शुभमन गिलची आणि चेतेश्वर पुजाराची झाली. दोघेही आत्मविश्वासाने फलंदाजी करत होते. मात्र दोघांनीही चेंडू सोडण्यात चूक केली अन् बोल्ड झाले.

अजिंक्य - रविंद्रने डाव सावरला पण..

पुजारा, गिल नंतर विराट कोहली देखील 14 धावा करून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 4 बाद 71 धावा अशी झाली. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजाने डाव सावरण्यास सुरूवात केली. इतकी पडझड होऊनही दोघेही सकारात्मक पद्धतीने खेळत होते. कारण इंग्लंडमध्ये विकेट्स तर पडणारच आहेत. त्यामुळे नुसतं बचावात्मक खेळून उपयोग नाही तुम्हाला धावा करणेही गरजेचे असते.

जडेजाने आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने बॉल टू रन धावा केल्या. तर रहाणेने त्याला दुसऱ्या बाजूने चांगली आणि स्थीर साथ दिली. मात्र पुन्हा एकदा भारताला केअरलेसपणाचा फटका बसला. जडेजा आणि रहाणेने पाचव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचत संघाला 125 धावांच्या पार पोहचवले होते. दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकेच राहिली होती. कमिन्सने नॅथन लॉयनच्या हातात चेंडू सोपवला. जडेजाने लॉयनला बाहेरच्या यष्टीवरील चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला अन् तो 48 धावांवर बाद झाला.

जडेजा बाद झाल्याने आता अजिंक्य रहाणेला भरत सोबत तिसऱ्या दिवशी कांगारूंच्या गोलंदाजांचे आव्हान पेलावे लागणार आहे. दिवसाचा खेळ संपत आला असताना जडेजा तो चेंडू सोडू शकला असता. मात्र त्याला तो खेळण्याचा मोह आवरता आला नाही. तेवढाच एक चेंडू स्पिन झाला अन् जडेजाचा घात झाला.

कांगारूंची स्मार्ट गोलंदाजी

ओव्हलच्या खेळपट्टीवर जरी गवत असले तरी तेथे चेंडू फार काही उसळी घेत नव्हता. दुसऱ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजीला पोषकच होती. मात्र ड्यूक चेंडू हा दीर्घकाळ स्विंग होतो. चेंडू स्विंग करायचा असेल तर तो पुढे गुडलेंथला टाकणे गरजेचे आहे. हेच भारतीय गोलंदाजांकडून पहिल्या दिवशी झाले नव्हते. त्याचा फायदा उचलत कांगारूंनी पहिल्याच दिवशी 327 धावा ठोकल्या.

ज्यावेळी भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा यशस्वीरित्या खेळून काढत होते. मात्र इथं पॅट कमिन्सने एक वेगळी ट्रिक वापरली. त्याने आपल्या गोलंदाजांना मोठे स्पेल न देता चार - पाच षटकानंतर गोलंदाज बदलत राहिला.

यामुळे गोलंदाजही जास्त दमले नाहीत अन् फलंदाजालाही प्रत्येकवेळी नव्या गोलंदाजाचा सामना करावा लागला. यामुळे त्यांना जम बसवण्यात अपयश आले. तसेच कांगारूंच्या गोलंदाजांनी आपला टप्पा सोडला नाही. त्यामुळेच ते भारताची टॉप ऑर्डर 71 धावात उडवू शकले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT