WTC Final 2023 Ricky Pointing Hardik Pandya  esakal
क्रीडा

WTC Final 2023 : भारतीय निवडसमितीने कसोटी संघ निवडताना केली मोठी चूक; पाँटिंग म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final 2023 Ricky Pointing Hardik Pandya : आयपीएलची धामधूम संपल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयरीला लागला आहे. ऑस्ट्रेलियासोबत 7 जून पासून ओव्हलमध्ये सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, दोन्ही संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

भारताने आपल्या संघात एक छोटा बदल केला असून ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जैसवाल याला स्टँड बाय खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. मात्र या बदलाबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग फारसा खूष नाही. त्याच्या मते भारतीय निवडसमितीने चांगली संधी वाया घालवली.

आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात बोलताना रिकी पाँटिंगने संघातील हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले. हार्दिकने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. तो आता कसोटी संघात देखील उपयुक्त ठरू शकतो असे मत पाँटिंग म्हणाला.

पाँटिंग म्हणाला की, 'मी विचार करत होतो की जर भारतीय संघात एकमेव कसोटी मालिकेसाठी हार्दिक पांड्या असता तर किती मजा आली आहे. मला माहिती आहे की हार्दिकने ऑन रेकॉर्ड सांगितले आहे की कसोटी क्रिकेट खेळणं हे त्याच्या शरिरावर अतिरिक्त ताण टाकण्यासारखं होईल. मात्र एकच कसोटी सामना खेळायचा आहे. त्याने आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्यात गोलंदाजी केली आहे. तो वेगाने गोलंदाजी करतोय.'

पाँटिंग पुढे म्हणाला की, 'एका कसोटी सामन्यासाठी त्याची निवड झाली असती तर तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरला असता. तो गोलंदाजी आणि फलंदाजीत कशी कामगिरी करतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरले असते. तो दोन संघातील फरक दर्शवणारा खेळाडू ठरला असता.'

हार्दिक पांड्याला WTC final च्या अनुशंगाने कसोटी क्रिकेटमध्ये परतणार का असे विचारण्यात आले होते. त्याने यासाठी नकार दिला नाही. त्याने कसोटी संघात दुसऱ्याची जागा घेण्यापेक्षा आपली जुनी जागा पुन्हा मिळवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते.

हार्दिक म्हणाला होता की, 'मी नैतिक दृष्ट्या खूप सक्षम व्यक्ती आहे. मी तिथपर्यंत पोहचण्यासाठी 10 टक्केही काम केलेले नाही. त्यामुळे तेथे जाणे आणि दुसऱ्याची जागा घेणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. जर मला कसोटी क्रिकेट खेळायचं असेल तर मी प्रक्रियेनुसार जाणे पसंत करेन अन् माझी जागा मिळवेन. त्यामुळेच मी WTC final साठी उपलब्ध नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT