WTC Final 2023 Rohit Sharma Viral Video  
क्रीडा

WTC Final 2023 VIDEO: लाइव्ह मॅचमध्ये रोहित शर्माने पार्टनरला केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

WTC Final 2023 Rohit Sharma Viral Video : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. ओव्हलवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास भाग पाडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने शानदार सुरुवात केली.

कांगारू संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट गमावून 327 धावा केल्या आहेत. संघासाठी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ 227 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 95 तर ट्रॅव्हिस हेड 156 चेंडूत 22 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 146 धावांवर खेळत आहे.

यादरम्यान भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी तडफडत असताना रोहित शर्माची निराशाही पाहायला मिळाली. तो इतका निराश झाला होता की तो आपल्या सहकाऱ्यांना शिव्या देताना दिसत होता. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाईव्ह मॅचमध्येच शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टी-ब्रेकच्या आधी जेव्हा रवींद्र जडेजा आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला तेव्हा रोहित शर्माने त्याच्या सहकारी खेळाडूला शिवीगाळ केली. चाहत्यांनी त्याच्या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. काही चाहते रोहितला या कृत्याबद्दल खूप फटकारत आहेत, तर काही जण म्हणतात की तो कर्णधार होण्यासाठी योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT