Ian Walton
क्रीडा

WTC - विराटने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण

सूरज यादव

भारताचा संघ दुसऱ्या डावात फक्त 170 धावाच करू शकला. त्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावांचे आव्हान मिळाले होते.

साउदम्प्टन - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडने 8 गडी राखून पराभूत केलं. या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतायी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, पराभवानंतर प्रतिक्रिया देताना विराट कोहली म्हणाला की, न्यूझीलंडचा विजयावर हक्क होता. मात्र विराटने पराभवाचं खापर पावसावर फोडलं आहे. पावसाने आलेल्या व्यत्ययामुळे भारताचे जम बसलेले फलंदाज बाद झाले. पाऊस आला नसता तर 30 ते 40 धावा जास्त झाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता.

भारताचा संघ दुसऱ्या डावात फक्त 170 धावाच करू शकला. त्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावांचे आव्हान मिळाले होते. केन विल्यम्सनच्या अर्धशतकी खेळीच्या आणि रॉस टेलरच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर हे आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण केले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य अशी 96 धावांची भागिदारी करत संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनवलं.

विराट म्हणाला की, पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेला होता. त्यानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा पुन्हा जम बसवणं कठीण होतं. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या. जर पावसाचा व्यत्यय आला नसता तर आमच्या आणखी धावा झाल्या असत्या. तसंच किवी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यांनी आम्हाला बॅकफूटवर ढकललं आणि आम्हाला 30 ते 40 धावा कमी पडल्या.

न्यूझीलंडच्या संघाचे आणि केन विल्यम्सनचे विराटने अभिनंदन केले. विराटने म्हटलं की, त्यानी उत्कृष्ट असा खेळ केला. तीन दिवसांपेक्षा थोडा जास्त वेळ मिळाला. त्यातही त्यांनी कसोटीचा निकाल लावला. त्यांनी आमच्या संघावर दबाव कायम राखला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT