WTC Final Scenario IND vs AUS What IF India draw in Ahmedabad and SriLanka script history in 1st Test against NewZealand cricket news-in-marathi 
क्रीडा

WTC 2023 : श्रीलंकेच्या पराभवासाठी भारतीयांचे देव पाण्यात! लंकेचा आज किवीविरुद्ध कसोटी सामना

WTC च्या अंतिम फेरीतील दुसरा संघ होणार निश्‍चित

सकाळ ऑनलाईन टीम

New Zealand vs Sri Lanka 1st Test : जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जूनमध्ये ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता दुसऱ्या स्थानासाठी भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये चुरस आहे.

आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चौथी कसोटी, तर श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यामधील पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. या लढतीनंतर अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्‍चित होण्याची दाट शक्यता आहे.

श्रीलंकेला अंतिम फेरी गाठायची असल्यास साधे समीकरण आहे. त्यांना न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकायचे आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघ चौथ्या कसोटीत पराभूत होणेही तेवढेच त्यांच्यासाठी गरजेचे आहे. भारताने अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित होईल.

श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या १९पैकी फक्त दोनच कसोटींमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यापैकी अखेरचा विजय २००६मध्ये त्यांनी मिळवला होता. हा इतिहास पाहता सध्या तरी अंतिम फेरीतील दुसऱ्या स्थानासाठी भारताचेच पारडे जड दिसून येत आहे.

स्पर्धेचा ताजा तक्ता

ऑस्ट्रेलिया - ६८.५२ (१४८ गुण)

भारत - ६०.२९ (१२३ गुण)

श्रीलंका - ५३.३३ (६४ गुण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

BMC Elections: देशातील हिंदू 1992 पुन्हा घडवण्यासाठी तयार... BMC निवडणुकीपूर्वी धीरेंद्र शास्त्रींचं मुंबईत वक्तव्य! राजकीय अर्थ काय?

Pune Mumbai Journey : पुणे-मुंबई प्रवास आता ९० मिनिटांत! नवीन द्रुतगती मार्गाच्या ‘डीपीआर’ला मंजुरी

New Year Upday 2026: नवीन वर्षात 'या' खास उपायांचे शांतपणे करा पालन, वर्षभर आर्थिक समस्यांचा करावा लागणार नाही सामना

Latest Marathi News Live Update : नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT