Shubman Gill  File Photo
क्रीडा

WTC Final माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मॅच : शुभमन गिल

इंग्लंडच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना माझ्या करियरमधील सर्वात मोठा क्षण आहे. दबावात न खेळता धावा करण्यावर भर देईन, असे त्याने म्हटले आहे.

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मैदानात उतरण्यापूर्वी युवा सलामीवीर शुभमन गिलने आपले इरादे स्पष्ट केले. इंग्लंडच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्धचा फायनल सामना माझ्या करियरमधील सर्वात मोठा क्षण आहे. दबावात न खेळता धावा करण्यावर भर देईन, असे त्याने म्हटले आहे. (WTC Final Will Be The Biggest Match Of My Life Says Shubman Gill)

जेव्हा तुम्ही धावा करता त्यावेळी गोलंदाज बॅकफूटवर जातो. गोलंदाजांना दबावात टाकण्यासाठी धावा करणे हाच मंत्र उपयुक्त ठरतो, असे सांगत त्याने फायनलमध्ये उपयुक्त खेळी करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितेल. कोलकाता नाईट रायडर्सच्या अधिकृत वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभमन गिलने मजबूत इराद्याने मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे सांगितले.

सराव सामन्यात 85 धावांची दमदार खेळी करुन 15 सदस्यीय टीम इंडियात स्थान मिळवलेल्या शुभमन गिलली प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान पक्के केले आहे. रोहित शर्माच्या साथीने तो संघाच्या डावाची सुरुवात करेल. इंग्लंड दौऱ्यावर तो अडखळत खेळताना दिसला होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील दमदार कामगिरीच्या जोरावर टीम व्यवस्थापनाने त्याच्यावर भरवसा दाखवला आहे. संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. शुभमन गिलने टीम इंडियाकडून 7 कसोटी सामन्यात 34.4 च्या सरासरीने 378 धावा केल्या आहेत. याशिवाय अंडर 19 आणि इंडिया ए कडून इंग्लंडच्या मैदानात खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. त्याचा त्याला या दौऱ्यावर निश्चितच फायदा होईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलने 91 धावांची खेळी केली होती. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. 7 सामन्यातील 13 डावात त्याने 644 चेंडूचा सामना करताना 378 धावा केल्या आहेत. पहिल्या शतकाच्या प्रतिक्षेत असलेल्या शुभमन गिलने 3 अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT