Eng Vs Nz 
क्रीडा

Eng Vs Nz: इंग्लंडच्या सलग दोन विजयामुळे WTC Points Table मध्ये मोठे बदल

इंग्लंड संघाने दूसऱ्या कसोटी सामन्यात चॅम्पियन न्यूझीलंडला पायदळी तुडवले

Kiran Mahanavar

Eng Vs Nz: इंग्लंड संघाने दूसऱ्या कसोटी सामन्यात चॅम्पियन न्यूझीलंडला पायदळी तुडवले आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक सामना बाकी असला तरी यजमान इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून मालिका ताब्यात घेतली आहे. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून तुफानी खेळी खेळली आणि संघाला पाच गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने या विजयासह 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने न्यूझीलंडचे 299 धावांचे लक्ष्य अवघ्या 50 षटकांत पूर्ण केले.(wtc points table eng after second test win)

जॉनी बेअरस्टोने सामन्याच्या शेवटच्या दिवशी 92 चेंडूत 136 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडला हे लक्ष्य गाठण्यात यश आली. इंग्लंडच्या या अप्रतिम विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठे फेर-बदल झाले आहे. डब्ल्यूटीसी क्रमवारीत इंग्लंडला फायदा झाला नसला तरी संघाच्या विजयाची टक्केवारी वाढली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा संघ 8 व्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ 7 व्या स्थानावर आहे. इंग्लंडची विजयाची टक्केवारी आता 19.23 वरून 25 टक्क्यांवर गेली आहे. सलग दुसरा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडची टक्केवारी 33.33 वरून 29.17 वर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 पॉइंट टेबलमध्ये 75 टक्के विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. आफ्रिकाची विजयाची टक्केवारी 71.43 टक्के इतकी आहे. भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची विजयाची टक्केवारी 58.33% आहे. पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ (52.38) आहे. वेस्ट इंडिज (35.71) सहाव्या आणि बांगलादेश (16.67) नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT