WTC Points Table India esakal
क्रीडा

WTC Points Table : दोन दिवसात कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने भारताचे काम केले सोपे

अनिरुद्ध संकपाळ

WTC Points Table India : भारताने बांगलादेशचा पाचव्या दिवशी 188 धावांनी पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. मात्र या विजयाने जेवढा फायदा भारताला या विजयामुळे झाला नाही तो फायदा अवघ्या दोन दिवसात कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने भारताला करून दिला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सनी पराभव केला. यामुळे भारत WTC Points Table अशा स्थानावर पोहचला आहे की जिथून आता 2021 मध्ये अधुरे राहुलेले स्वप्न पूर्ण करणे दृष्टीक्षेपात आले आहे.

भारताने बांगलादेशेचा 188 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारत WTC पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहचला. मात्र WTC ची फायनल ही पहिल्या दोन स्थनांवरील संघात होते. त्यामुळे अजून भारतासाठी ती फायनल थोडी दूर होती. मात्र ऑस्ट्रेलियाने दोन तासातच भारताला मोठा फायदा झाला. दुसऱ्या स्थानावर असलेली दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर घसरली आणि भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला.

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया 76.92 टक्के विनिंग पर्सेंटेज राखून अव्वल स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून दोन दिवसातच पराभूत होणारी दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के विनिंग पर्सेंटेज घेऊन तिसऱ्या स्थानावर घसरली. तर भारताचे विनिंग पर्सेंटेज (55.77 टक्के) दक्षिण आफ्रिकेपेक्षा थोडे जास्त असल्याने भारत दुसऱ्या स्थानावर पोहचला.

भारताला आता आपले दुसरे स्थान अबाधित राखण्याची सुवर्ण संधी आहे. भारताला बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका 2 - 0 अशी जिंकावी लागेल. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मायदेशात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत अशीच दमदार कामगिरी करणे सुरू ठेवावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT