the great khali And akshay kumar  E Sakal
क्रीडा

अक्षयच्या गाण्यावर खलीचा ग्रेट डान्स; व्हिडिओ व्हायरल

त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुशांत जाधव

WWE च्या रिंगमध्ये भारताचे नाव गाजवणारा द ग्रेट खली (The Great Khali) सोशल मीडियावरही सक्रीय दिसतोय. नुकताच खलीच्या नावाचा WWE च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. सोशल मीडियावरील लोकप्रिय ठरत असलेल्या इन्स्टाग्रामवर तो चांगलाच सक्रीय दिसते. खलीने नुकताच इन्स्टा अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाउसफुल-4' मधील 'बाला वो बाला' या लोकप्रिय गाण्यावर नाचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

WWE दिग्गज या व्हिडिओत खास लूगमध्ये दिसतोय. धिप्पाड रेसलर आपल्या तोऱ्यात गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळते. डान्सच्या त्याच्या स्टेप पाहून अनेकांना हसू आवरनार नाही. पण काही चाहते त्याच्या या प्रयत्नाला दाद देतानाही पाहायला मिळते. चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटल्या आहेत.

खलीने मजेदार व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याचा असा हटके अंदाज चाहत्यांनी पाहिला आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटातील बाला हे गाणे खूपच लोकप्रिय असून अनेक कॉरिओग्राफर वेगवेगळ्या पद्धतीने हे गाणे सादर करताना पाहयला मिळआले आहे. खली त्याच्या वेगळ्याच अंदाजात गाण्याचा आनंद घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

सध्याच्या घडीला खली WWE च्या रिंगमध्ये काम करत नाही. पण त्याची कामगिरीही कायम लक्षात राहणारी अशीच आहे. WWE मधील टॉप सुपरस्टार अंडरटेकर, बतिस्ता, ट्रिपल एच आणि जॉन सीना यांच्यासोबत खली लढताना दिसला आहे. नुकेतच त्याला हॉल ऑफ फेममध्ये सामील करुन गौरवण्यात देखील आले होते.

wwe the great khali akshay kumar bala song video viral watch it

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT