IND vs ENG esakal
क्रीडा

IND vs ENG : यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा विकेट्सचा षटकार; दुसऱ्या दिवशीच भारताची सामन्यावर पकड

India Vs England 2nd Test Day 2 : यशस्वीच्या द्विशतकानंतर फिरकीला पोषक खेळपट्टीवर बुमराहचा धुमाकूळ

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England 2nd Test Day 2 :

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड निर्माण केली. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताचा डाव 396 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने पुढच्या दोन सत्रात इंग्लंडाचा पहिला डाव 253 धावात संपवला.

दुसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वालचे द्विशतक आणि जसप्रीत बुमराहचा विकेट्सचा षटकार चर्चेत राहिले. यशस्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले वहिले द्विशतक ठोकले. भारताकडून कसोटीत द्विशतक ठोकणारा तो चौथा फलंदाजी ठरला. इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने 76 तर बेन स्टोक्सने 47 धावा करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

दुसरा दिवस यशस्वीच्या द्विशतकाने आणि जसप्रीत बुमराहच्या 6 विकेट्सने गाजला. दिवसाच्या सुरूवातीला भारताने आपला पहिला डाव 334 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. यशस्वी जैस्वाल आणि आर. अश्विन यांनी डाव पुढे नेला. अश्विन 20 धावांवर पोहचला असताना अँडरसनने त्याची विकेट घेतली. दरम्यान, यशस्वीने आपले पहिले वहिले द्विशतक पूर्ण केलं.

मात्र द्विशतक पूर्ण केल्यानंतर तो बाद झाला. त्याने 209 धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यानंतर रेहान आणि बशीरने भारताचा डाव संपवण्यास वेळ लावला नाही. रेहानने बुमराहला 6 धावांवर तर बशीरने मुकेशला शुन्यावर बाद करत भारताचा पहिला डाव 396 धावांवर संपवला.

यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर झॅक क्राऊलीने तर 78 चेंडूत 76 धावा ठोकत भारताचे टेन्शन वाढवले होते. मात्र कुलदीपने बेन डकेटला बाद करत इंग्लंड पहिला धक्का दिला. त्यानंतर पोप आणि क्राऊलने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

मात्र अक्षर पटेलने क्राऊलीला 76 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्याने रूट, ओली पोप आणि बेअरस्टोची शिकार केली.

त्यानंतर कुलदीपने फोक्सचा 6 धावांवर त्रिफळा उडवला. पाठोपाठ रेहान अहमदला देखील 6 धावांवर बाद करत कुलदीपने आपली तिसरी शिकार केली. मात्र स्टोक्सने 47 धावा करत एक बाजू लावून धरली होती. तो तळातील फलंदाजांच्या साथीने भारताचे मनसुबे उधळणार असे वाटत असतानाच बुमराह पुन्हा संघाच्या मदतीला धावून आला.

बुमराहने स्टोक्सचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नाही. त्यानंतर टॉम हार्टलीला 21 धावांवर तर जेम्स अँडरसनला 6 धावांवर बाद करत इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर संपवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabutarkhana: ...तर आम्ही शस्त्रही उचलू; जैन समाजाच्या मुनींची थेट धमकी, कबुतरखान्यांवरील बंदीचा वाद चिघळला

Devendra Fadnavis: 'ओबीसी समाज दुरावल्याने यात्रेची आठवण'; मंडल यात्रेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Manoj Jarange: मुंबईत आंदोलन करणारच : मनोज जरांगे; 'मराठा नेत्यांना भाजपमध्ये त्रास'

MP Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनाही ‘ते’ दोघे भेटले: खासदार संजय राऊतांचा दावा; शरद पवारांच्या दाव्याचे समर्थन

Deputy Chief Minister: शिवसेना आपल्या पाठीशी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; श्रीनगरमध्ये घोडेवाल्याच्या कुटुंबीयांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT