IND vs WI 2nd test Yashasvi Jaiswal  esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal IND vs WI 2nd Test : रोहितनं 2013 मध्ये केला होता मोठा कारनामा; 10 वर्षांनी यशस्वीही करणार पुनरावृत्ती?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs WI 2nd test Yashasvi Jaiswal : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आतपासून त्रिनिदाद येथे होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवालने पदार्पणातच 171 धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील 103 धावांची शतकी खेळी करत यशस्वीच्या साथीने 229 धावांची सलामी दिली होती.

आता दुसऱ्या कसोटी देखील त्याच्याकडून शतकाची अपेक्षा केली जात आहे. जर डावखुरा यशस्वी जैसवाल जर असा कारनामा करण्यात यशस्वी झाला तर तो भारताचा कर्णधार रोहित शर्माशी बरोबरी करले. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील आपली कसोटी कारकीर्द ही वेस्ट इंडीजविरूद्धच केली होती. (Yashasvi Jaiswal News)

त्याने 2013 मध्ये भारतात वेस्ट इंडीज विरूद्ध झालेल्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सलग दोन शतके ठोकली होती. आता 10 वर्षानी अशीच संधी यशस्वी जैसवालकडे देखील आहे. त्याने पहिल्या कसोटीत 171 धावांची मोठी खेळी केली होती. त्याची धावांची भूक आणि लय पाहता तो दुसऱ्या कसोटीत देखील शतकी खेळी करेल अशी आशा आहे.

मोहम्मद अजहरूद्दीन, गांगुली अन् रोहितच्या पंक्तीत बसण्याची यशस्वीला संधी

भारताकडून पदार्पणाच्या कसोटी मालिकेत पाठोपाठ दोन शतके ठोकण्याची किमया पहिल्यांदा मोहम्मद अजहरूद्दीनने केली होती. त्याने 1984 - 85 मध्ये इंग्लंडविरूद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत पाठोपाठ दोन शतके ठोकली होती. यानंतर सौरव गांगुलीने देखील 1996 च्या इंग्लंड दौऱ्यावर आपल्या पदार्पणाच्या कसोटीत सलग दोन शतके ठोकली होती.

यानंतर 2013 मध्ये रोहित शर्माने वेस्ट इंडीज विरूद्ध पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सलग दोन शतके ठोकली होती. जर यशस्वी जैसवाल आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली तर तो देखील या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसू शकले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाने २५ वर्षांचा रेकॉर्ड मोडला; जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'इतका' पाणीसाठा

१०व्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकनांची यादी जाहीर; कोण ठरणार सर्वोत्कृष्ट? 'या' चित्रपटांमध्ये चुरस

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

SCROLL FOR NEXT