Cheteshwar Pujara BCCI Twitter Stu Forster
क्रीडा

दर्जा कळला का? पुजाराच्या टोलर्संना रोहितचं उत्तर

पहिल्या डावातील फ्लॉप शोनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर पुजाराच्या भात्यातून मोलाच्या धावा निघाल्याचे पाहायला मिळाले.

सुशांत जाधव

Rohit Sharma On Cheteshwar Pujara : भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) खेळीवर भाष्य केले आहे. हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या (Headingley Leeds Test) तिसऱ्या दिवशी पुजारा सकारात्मकतेनं मैदानात उतरला होता. चौथ्या दिवशी त्याची अशीच बॅटिंग बघायला मिळेल, असे रोहित शर्माने म्हटले आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर आहे. पहिल्या डावातील फ्लॉप शोनंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर पुजाराच्या भात्यातून मोलाच्या धावा निघाल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडने पहिल्या डावात 354 धावांची आघाडी घेतलीये. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दोन विकेटच्या मोबदल्यात 215 धावा केल्या होत्या. भारतीय संघ अजूनही 139 धावांनी पिछाडीवर असून चौथ्या दिवशी पुजारा आणि कोहलीच्या खांद्यावर भारतीय संघाच्या डावाला सकारात्मक रुप देण्याची जबाबदारी असेल. तिसऱ्या दिवसाअखेर पुजारा 91 धावांची खेळी करुन नाबाद राहिला होता. दुसऱ्या बाजूला विराट कोहली 45 धावांवर खेळत होता.

पुजाराच्या खेळीनं रोहित शर्मा चांगलाच प्रभावित झालाय. रोहित म्हणाला की, ज्या व्यक्तीनं 80 कसोटी सामने खेळले आहेत त्याबद्दल शंका बाळगणे योग्य नाही. त्याने काय करावे, कसे खेळावे हे सांगण्याची गरज नसते. आम्ही धावा करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलो होतो. पुजाराने ही तेच केलं.

ज्या पद्धतीने पुजाराने खेळाला सुरुवात करुन खेळी पुढे नेली ते कौतुकास्पद होते. त्याने सुरुवातीपासून धावा करण्यासाठी भूकेला असल्याची मानसिकता दाखवून दिला. या मानसिकतेचा फायदा मिळतो. जेव्हा तुम्ही धावा बनवण्याच्या इराद्याने खेळत असता तेव्हा खराब चेंडूचा योग्य तो समाचार घेतला जातो. पुजाराला आपण वर्षांनुवर्षे पाहतोय. तो लयबद्ध खेळाडू आहे. मागील काही सामन्यात त्याच्याकडून धावा होत नाहीत. याचा अर्थ त्याची क्वालिटी गायब झाली आहे, असा होत नाही. त्याने तिसऱ्या दिवशी आपली क्वालिटी कायम असल्याचे दाखवून दिले, असे रोहित शर्माने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT