Glenn Maxwells and Vini Raman Love Story  Sakal
क्रीडा

कोण आहे Maxwell ची होणारी नवरी Vini Raman; कसं जुळलं सूत?

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwells) आणि भारतीय वंशाची विनी रमन ही जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. पुढच्या महिन्यात 27 मार्चला ही जोडी आयुष्याच्या नव्या पार्टनरशिपला सुरुवात करेल. एका वर्षापूर्वीच या जोडीचा साखर पुड्याचा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने पार पडला होता. त्यामुळे ही जोडी विवाह हिंदू पद्धतीने करणार की ईसाई पद्धतीने असा प्रश्न मॅक्सीच्या चाहत्याना पडला आहे. दोघांनीही यासंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे याचा अंदाज लावणे सध्याच्या घडीला थोडं कठीणच आहे.

कोण आहे विनी रमन

विनी रमन (Vini Raman) एक भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार ती मेलबर्नमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. तिचे कुटुंबिय मूळचे चेन्नईतील असून तिचा जन्म हा ऑस्ट्रेलियातच झाला. विनीचे वडील वेंकट रमन आणि आई विजयलक्ष्मी रमन विनीच्या जन्माआधीच ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले होते. विनी रमण मूळची चेन्नईची त्यामुळेच त्यांची जी लग्नपत्रिका व्हायरल होतीये ती आपल्याला तमिळमध्ये दिसून येते. सोशल मीडियावर या लग्न पत्रिकेला चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळाले आहे.

मॅक्सवेल आणि विनीची पहिली भेट

जिथं ग्लेनमॅक्सवेलचा जन्म झाला त्या विक्टोरिया शहरातच विनीनं शिक्षण घेतले. या दोघांची भेट बिग बॅश लीग (BBL) मधील मेलबर्न स्टार्सच्या एका कार्यक्रमात झाली. यावेळी देशांतर्गत क्रिकेट टीम असलेल्या मॅक्सवेल मलबर्न स्टार्सचे नेतृत्वही करत होता. या कार्यक्रमातचे ही जोडी पहिल्यांदा एकमेकाला भेटली होती. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले आणि हळूहळू दोघांमधील प्रेम फुलत गेले.

त्या पहिल्या भेटीनंतर दोघे आले प्रेमाच्या पहिल्या पायरीवर...

कार्यक्रमातील पहिल्या भेटीनंतर मॅक्सवेल आणि विनी यांच्यात मैत्री झाली. ऑगस्ट 2017 मध्ये विनीनं मॅक्सवेलसोबत पहिला फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना तिने 'फ्रेंडशिप'चा उल्लेख केला होता. प्रेमाची पहिली पायरी मैत्री असते असे मानले जाते त्यामुळेच या दोघांमध्ये प्रेम कहाणीला सुरवात झाल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. दोघांनी एकत्रित युरो ट्रिपही केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.

दोन वर्षानंतर मॅक्सीची पहिली पोस्ट

विनीनं इन्स्टा मॅक्सवेलसोबत पहिला फोटो शेअर केल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी मॅक्सवेलनं तिच्यासोबतचा खास फोटो शेअर केला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवार्ड कार्यक्रमात ही जोडी सोबत आली होती. मॅक्सिने विनीच्या हातात हात घालून काढलेला फोटो शेअर करत नाते हळूहळू आणखी घट्ट होत असल्याचे संकेत दिले होते.

मॅक्सीनं सार्वजनिक पार्कमध्ये गुडघ्यावर बसून केलं होतं प्रपोज

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मॅक्सवेलनं विनीला प्रपोज केल्याचा किस्सा शेअर केला होता. सूर्यास्तावेळी बीचवर विनीला प्रपोज करण्याचा प्लॅन मॅक्सीनं आखला होता. पण तो वर्क झाला नाही. त्यानंतर मॅक्सवेलनं विनीला पोर्ट मेलबर्नच्या एका पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवलं. दुपारची वेळ होती. त्यामुळे पार्कमध्ये खूप गर्दी होती. पार्कमध्ये लोकांची गर्दी आणि शाळेतील मुल खेळत होती. मॅक्सी एका झाडाखाली विनीची वाट बघत बसला होता. पण नेमकी विनी वाट चूकली. आपण थांबलेल्या ठिकाणी येईपर्यंत मॅक्सवेलनं विनीला दिशा दाखवली. ती ज्यावेळी पोहचली त्यावेळी थेट गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT