क्रीडा

VIDEO : वॉर्नला पदार्पणाच्या सामन्यात शास्त्रींनी रडवलं, पण शेवटी...

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. त्याच्या जाण्याचे वृत्त क्रिकेट जगताला मोठा धक्काच होता. या वृत्तानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना वॉर्नचा क्रिकेट प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा सातशे विकेट्सचा टप्पा गाठणाऱ्या शेन वॉर्नने भारतीय संघा विरुद्धच्या सामन्यातूनच कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1992 मध्ये सिडनीच्या मैदानातील पदार्पणाच्या सामन्यात युवा शेन वॉर्नची रवि शास्त्रींनी चांगलीच धुलाई केली होती. पण शेवटी द्विशतकवीर शास्त्रीला बाद करण्यात वॉर्न यशस्वी ठरला होता. शास्त्रींनी या सामन्यात 206 धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या सामन्यात नाबाद 148 धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटी सामन्यात शेन वॉर्नने 45 षटके गोलंदाजी केली होती. यात 7 निर्धाव षटकासह त्याने रवि शास्त्रीच्या रुपात एकमेव विकेट घेतली. ज्या सिडनीच्या ग्राउंडवर वॉर्नने पहिला कसोटी सामना खेळला त्याच मैदानात त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने मॉन्टी पानेसरला शून्यावर बाद करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजारी पूर्ण केली होती. दुसऱ्या डावात अँड्रू फ्लिंटॉफची विकेट घेतली एडम गिलख्रिस्ट वॉर्नच्या गोलंदाजीवर सुरेख स्टम्पिंग केले होते. ही त्याच्या कसोटी कारकिर्रदीतील कसोटीतील शेवटची विकेटच ठरली.

1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शेन वॉर्नने 15 वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 145 कसोटी सामने खेळले. यात त्याने 708 विकेट घेतल्या. 194 वनडे सामन्यात त्याच्या खात्यात 293 विकेट्सची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT