katrina kaif viral photo  twitter
क्रीडा

फोटोतला 'बच्चा' टीम इंडियातला हिरो; कतरिना आधी उरकलं लग्न

सुशांत जाधव

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच विकी कौशलशी (Vicky Kaushal) विवाहबद्ध झालेल्या कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यात तिचा एक जुना फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. कतरिनाचा जो फोटो व्हायरल (katrina kaif viral photo) होत आहे त्यात ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या जर्सीत दिसत आहे. आणि या फोटो चर्चेत येण्यामागचं कारण आहे त्या फोटोत दिसणारा मुलगा. (Katrina Kaif With Indian Cricketer Photo Goes Viral )

आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या हंगामात 2008 मध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती. यावेळी ती प्रत्येक सामन्यात आरसीबीच्या संघाला चीअर अप करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसायची. विजय माल्या आणि सिद्धार्थ माल्या यांच्यासोबत आल्यानंतर ती चांगलीच चर्चेतही आली होती. याच दरम्यान जसप्रीत बुमराही (jasprit bumrah) बंगळुरुच्या संघाला प्रोत्साहन करताना दिसले होते. कतरिना संघाला चेअर करत असतानाचा जो फोटो व्हायरल होतोय त्यात बुमराही दिसतोय. 2013 मध्ये बुमराहने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सुरुवातीपासूनच तो मुंबई इंडियन्ससोबत आहे.

व्हायरल फोटोत दिसणारा बच्चा बुमराह केवळ मुंबई इंडियन्सचा नव्हे तर टीम इंडियाचाही प्रमुख गोलंदाज आहे. फोटोत तो छोटा दिसत असला तरी कतरिनाच्या अगोदरच तो विवाहबद्ध झाला आहे. याच वर्षी 15 मार्च रोजी बुमराहने स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशन हिच्यासोबत लग्न केले होते. कतरिना आणि बुमराह यांच्या वयात खूप अंतर असल्याचे व्हायरल फोटोमध्ये दिसून येते. सध्याच्या घडीला बुमराह 28 वर्षांचा आहे. दुसरीकडे कतरिना कैफ 38 वर्षांची आहे. दोघांच्या वयात दशकभराचे अंतर आहे. कमालीचा योगायोग म्हणजे बुमरहा आणि कतरिना यांचे लग्न याच वर्षी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT