rashid khan  File Photos
क्रीडा

राशिद खानने नाकारली कॅप्टन्सीची ऑफर

कॅप्टन होण्यापेक्षा एक खेळाडू म्हणून संघासाठी उपयुक्त समजतो, असे राशिद खानने म्हटले आहे. संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा एक खेळाडू म्हणून संघासोबत राहणे पसंत करेन. उप कर्णधार पद भुषवताना कॅप्टन आणि संघाला योग्य ती मदत करेन, असेही तो म्हणाला आहे.

सुशांत जाधव

क्रिकेट जगतात राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक संघातील खेळाडूंमध्ये चढाओढ पाहायला मिळते. पण अफगाणिस्तानच्या संघाला कॅप्टन मिळेना झालाय. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा समोर असताना बोर्डाने टी-20 संघाच्या कॅप्टन्सीची ऑफर दिली होती. पण त्याला नेतृत्वाचा तुरा रोवून मिरवण्यात इंट्रेस्ट दिसत नाही. राशिद खानने (Rashid Khan) राष्ट्रीय टी20 टीमचे नेतृत्व करण्यास नकार दिलाय. कॅप्टन होण्यापेक्षा एक खेळाडू म्हणून संघासाठी उपयुक्त समजतो, असे राशिद खानने म्हटले आहे. संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा एक खेळाडू म्हणून संघासोबत राहणे पसंत करेन. उप कर्णधार पद भुषवताना कॅप्टन आणि संघाला योग्य ती मदत करेन, असेही तो म्हणाला आहे.

2019 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिद खानकडे तिन्ही प्रकारातील नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. परंतु काही काळातच त्याच्या जागी असगर अफगानची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा खांदे पालट झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाची बैठक पार पडली. यावेळी हशमतुल्ला शाहिदी यांच्याकडे टेस्ट आणि वनडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. तर टी-20 संघाच्या नेतृत्वाची धूरा राशिद खानकडे सोपवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र राशिद खानने ही ऑफर नाकारली आहे.

राशिद खानने ईएसपीएनक्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली. संघाच्या नेतृत्व करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. नेतृत्व करत असताना वैयक्तिक कामगिरीवर परिणाम होईल, असे वाटते. त्यामुळे संघाच्या उप-कर्णधार राहून संघासाठी उपयुक्त कामगिरी करेन, असे तो म्हणाला. एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करणे संघासाठी आणि माझ्यासाठी चांगला निर्णय वाटतो. ज्या गोष्टीमध्ये सर्वोत्तम करु शकतो त्यावर अधिक भर देईन, असे म्हणत त्याने नेतृत्वासाठी तयार नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT