Yuvraj Singh As Team India Mentor In ICC Events News Marathi sakal
क्रीडा

Yuvraj Singh : 5 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती! आता 'सिक्सर किंग' युवराज घेणार टीम इंडियात मोठी जबाबदारी?

Yuvraj Singh News |

Kiran Mahanavar

Yuvraj Singh : टी-20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी जवळपास सगळ्या संघांनी सुरू केली आहे. क्रिकेटची सर्वात मोठी ICC टूर्नामेंट वर्ल्ड कप या वर्षी जून महिन्यात खेळला जाणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना 1 जून रोजी होणार आहे. याशिवाय या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय क्रिकेट संघात अनुभवी खेळाडू युवराज सिंगला संघात मोठी जबाबदारी मिळू शकते.

टीम इंडियात 11 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ

युवराज सिंग हा भारतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. युवराज सिंगने 2017 मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आणि त्याने 10 जून 2019 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आता त्याने पुन्हा टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय संघ गेल्या 11 वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. यानंतर भारताने अनेकवेळा फायनल किंवा सेमीफायनल गाठली आहे, पण एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

अशा स्थितीत भारतीय संघाने दडपणाखाली खेळण्याची सवय लावायला हवी. त्यामुळे भारताचा अनुभवी खेळाडू आणि 2-2 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा खेळाडू युवराज सिंग ही जबाबदारी पार पाडू शकतो.

काय म्हणाला युवराज सिंग?

भारतीय संघातील खेळाडू खूप चांगले आहेत, पण ते दडपण सहन करू शकत नसल्याचे खुद्द युवराज सिंगने म्हटले आहे. भारताच्या एक-दोन खेळाडूंनी दडपण सहन केले तर काहीही होणार नाही, भारतीय संघ तेव्हाच जिंकेल जेव्हा सर्व खेळाडूंमध्ये दबावाखाली चांगली कामगिरी करण्याची क्षमता असेल.

तो पुढे म्हणाला की, मला माझा अनुभव भारताच्या युवा खेळाडूंना द्यायचा आहे. माझी मुलं मोठी झाल्यावर मी क्रिकेटला वेळ देऊ इच्छितो आणि खेळाडूंना दबावाखाली खेळायला शिकवू इच्छितो.

यावरून हे स्पष्ट झाले आहे की, युवराज सिंगला स्वतः भविष्यात भारतीय संघासोबत काम करायचे आहे. अशा परिस्थितीत युवराज सिंगला टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेंटॉर म्हणून संघात समाविष्ट केले जाऊ शकते किंवा त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT