Yuvraj Singh Goa Holiday Home  ESAKAL
क्रीडा

Yuvraj Singh : चाहत्यांसाठी युवराजच्या गोव्यातील 'हॉलिडे होम'मध्ये राहण्याची सुवर्ण संधी

अनिरुद्ध संकपाळ

Yuvraj Singh Goa Holiday Home : भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आपले गोव्यातील हॉलिडे होम दोन दिवसांसाठी सहा जणांच्या ग्रुपला देणार आहे. यासाठी तो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एअरबीएनबी (Airbnb) संस्थेचा होस्ट झाला आहे. गोव्याच्या नयनरम्य टेकडीवर युवराज सिंगचे 'कासा सिंग' हे हॉलिडे होम आहे. युवराज सिंगच्या घरातून गोव्याचा समुद्रकिनारा, सनसेटचा नजारा पाहता येतो तसेच घरातील स्विमिंग पूल आणि स्वादिष्ट जेवणाचाही आस्वाद घेता येईल. युवराज सिंग हा Airbnb वर होस्ट करणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

युवराज सिंगने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. तो आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'माझ्या कामामुळे मी जगभर फिरत असतो. गोव्यातील माझे घर माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक शांत ठिकाण आहे. मला सांगायला आनंद होत आहे की सहा जणांच्या समुहासाठी माझे हॉलिडे होम मी देऊ इच्छितो. याचे बुकिंग फक्त airbnb.com/yuvrajsingh याच्यावर करता येईल. 'कासा सिंग'साठी बुकिंग 28 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून सुरू होणार आहे.'

'कासा सिंग' मध्ये राहणाऱ्या अतिथींसाठी खालील विशेष सुविधा असणार आहेत.

  • आगमनानंतर युवराज सिंग यांच्याकडून व्हर्च्युअल पद्धतीने अभिवादन

  • सिंग यांच्या गोव्यातील आवडत्या हँगआउट स्पॉट्स शेअर करणारी स्वागत टिप

  • नयनरम्य दिवार बेटावर ई-बाईकवर सहल, खारफुटीचे शेत, चर्च, मंदिरे आणि सुंदर घरे यातून फिरण्याचा अनुभव

  • युवराज यांच्या आयकॉनिक इनिंगचे स्क्रीनिंग - क्रिकेटरच्या घरी त्या क्षणांचे पुनरुज्जीवन

  • मुक्कामाला असेपर्यंत युवराज यांचे आवडते स्थानिक पदार्थ चाखण्याची संधी

  • युवराज यांच्याकडून वैयक्तिकृत स्मरणिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari announcement: नितीन गडकरींकडून महाराष्ट्र-कर्नाटकशी निगडीत मोठ्या प्रकल्पास मंजुरी!, आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार

Jalgaon News : जळगावात आमदारकीची जागा ३ वर्षांपासून रिक्त; जिल्हा परिषद निवडणुकांमुळे विधान परिषदेचा पेच कायम!

MPSC Exam Result : शेतकऱ्याच्या मुलीची उपविभागीय कृषी अधिकारीपदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध, अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग; कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT