Yuvraj Singh Stuart Broad Retirement  esakal
क्रीडा

Yuvraj Singh Stuart Broad : दरारा निर्माण करणाऱ्या... युवराजची निवृत्त होणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडसाठी खास पोस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Yuvraj Singh Stuart Broad : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने नुकतेच क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याची घोषणा केली. स्टुअर्ट ब्रॉडने 344 सामन्यात 845 विके्स घेणारा ब्रॉड हा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या अॅशेस कसोटीनंतर निवृत्त होणार आहे.

ब्रॉडने निवृत्तीची घोषणा करताच सोशल मीडियावर त्याच्यासोबत खेळलेल्या खेळाडूंच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. मात्र या सर्वांमध्ये सर्वात लक्षवेधी प्रतिक्रिया ही युवराज सिंगची ठरली. युवराज सिंगने 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. (Stuart Broad Retirement News)

युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, 'स्टुअर्ट ब्रॉडच्या कामगिरीला सलाम! तुझ्या जबरदस्त कसोटी कारकिर्दीसाठी तुझं अभिनंदन, लाल चेंडूवरचा एक अत्यंत उत्तम आणि दरारा निर्माण करणारा गोलंदाज अन् खरा दिग्गज! तुझा प्रवास आणि दृढनिश्चय या नक्कीच प्रेरणा देणार आहे. भविष्यासाठी शुभेच्छा ब्रॉडी!'

युवराजने 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारत अस्मान दाखवलं होत. मात्र त्यानंतर ब्रॉड खचून गेला नाही तर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 850 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रॉडने आपल्या निवृत्तीची घोषणा अॅशेस 2023 मधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी केली. ओव्हलवर सुरू असलेल्या सामन्याचा तिसरा दिवस संपला त्यावेळी ब्रॉड म्हणाला,

'उद्या किंवा सोमवारी मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळत असेन. हा खूप सुंदर प्रवास होता. नॉटिंगहमशायर आणि इंग्लंडची कॅप घालणे ही खूप मोठी गौरवाची बाब होती. सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घेण्याची माझी मनिषा होती. या मालिकेत मी खेळाचा सर्वात जास्त आनंद घेतला.'

स्टुअर्ट ब्रॉचने 167 कसोटीत 602 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटीत फलंदाजीत देखील मोठे योगदान दिले आहे. त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतकांच्या सहाय्याने तब्बल 3656 धावा केल्या आङेत. तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT