Yuzvendra Chahal Deepak Hooda Shine  esakal
क्रीडा

IND vs NZ : वर्ल्डकपमधील 'बेंच'वरील खेळाडूंनी न्यूझीलंडमध्ये मैदान गाजवलं

अनिरुद्ध संकपाळ

Yuzvendra Chahal Deepak Hooda Shine : दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल 65 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करत विजयाचा पाया रचला. मात्र त्यावर दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल मोहम्मद सिराज या वर्ल्डकपमध्ये जास्त खेळण्याची संधी न मिळालेल्या खेळाडूंनी विजयी कळस चढवला. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 191 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 126 धावात संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक 61 धावा केल्या.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या सावटाखालीच सामना सुरू झाला. भारताने ऋषभ पंत आणि इशान किशन यांना सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला. मात्र पंतने पुन्हा एकदा निराशा केली. मात्र इशान किशन आक्रमक फलंदाजी करत होता. दरम्यान, विराटच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत. न्यूझीलंडमधील उसळी घेणाऱ्या चेंडूंचा आणि जवळ असलेल्या बाऊंड्री लाईनचा फायदा घेत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. अर्धशतकानंतर त्याने गिअर बदलला आणि भारताला 200 च्या पार पोहचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेवटच्या फेजमध्ये टीम साऊदीने हॅट्ट्रिक घेत भारताच्या या मनसुब्याला चाप लावला. अखेर भारताने 20 षटकात 6 बाद 191 धावा केल्या. यात एकट्या सूर्यकुमारने नाबाद 111 धावा चोपल्या. किशनने 36 धावांचे योगदान दिले.

त्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये कसून मारा केला. त्याचा फायदा नंतर फिरकीपटूंना देखील झाला. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अंतिम 11 च्या संघात खेळण्याची फारशी संधी न मिळालेल्या दीपक हुड्डाने गोलंदाजात कमाल करत 10 धावात 4 विकेट घेतल्या. संपूर्ण वर्ल्डकप बेंचवर बसून काढणाऱ्या युझवेंद्र चहलने 26 धावात 2 विकेट्स घेतल्या. या दोघांना मोहम्मद सिराजने 24 धावात 2 विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने 52 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तर डेवॉन कॉनवॉयने 25 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain Like Alcohol: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT