Yuzvendra Chahal First Reaction After Divorce With Dhanashree Verma Rumours Pop Up esakal
क्रीडा

Yuzvendra Chahal: पत्नी धनश्रीशी काडीमोड?चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला..

अनिरुद्ध संकपाळ

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ आल्याच्या बातम्या येत आहेत. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावमधून चहल हे नाव काढून टाकल्यानंतर युझवेंद्र आणि धनश्री घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता युझवेंद्र चहलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'सर्वांना एक कळकळीची विनंती आमच्या नात्यासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता हे सगळ संपवा. प्रत्येकाला प्रेम आणि प्रकाश.' युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध जोडी आहे. या दोऱांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. धनश्री वर्मा ही कोरियोग्राफर आहे. तिचे भारतीय संघातील खेळाडूंबरोबरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले होते.

युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यानंतर त्याच्या घटस्फोट संबंधित चर्चाना सुरू झाल्या आहेत. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलले होते. आधी ती धनश्री वर्मा चहल लावत होती, पण आता ती फक्त धनश्री वर्मा असे नाव ठेवले आहे. या बदलानंतर युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये 'न्यू लाइफ लोडिंग' असे लिहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात Foreign Funding? दोन परदेशी कंपन्या EDच्या रडारवर, 14 कोटींचा निधी संशयाच्या भोवऱ्यात

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल गोल्डन डक, विराट ७ धावांवर बाद... तरीही किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; २२ चेंडूंत बरंच काही घडलं

रस्त्याच्या बाजूला पडलेलो, एका बंगाली माणसाने... अशोक सराफ यांनी सांगितली अपघाताची आठवण; म्हणाले- ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...

Latest Marathi News Live Update: झारखंडच्या नक्षलवाद्याला ३ दिवसांची रिमांड

FDA Action: दिवाळीत भेसळखोरांवर 'एफडीए'चा बडगा! मुंबईतील तपासणी मोहिमेत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद

SCROLL FOR NEXT