World Cup 2023 Qualifiers 
क्रीडा

World Cup 2023 Qualifiers: झिम्बाब्वेचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर

भारतात वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगले! स्कॉटलंडकडून लाजिरवाणा पराभव

सकाळ ऑनलाईन टीम

ICC World Cup 2023 Qualifiers : विश्‍वकरंडक पात्रता फेरीच्या साखळी फेरीत वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेला मंगळवारी सुपर सिक्स लढतीत स्कॉटलंडकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे आता झिम्बाब्वेचे विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.

स्कॉटलंडला मात्र आता मुख्य फेरीत पोहोचण्याची संधी असणार आहे. सुपर सिक्समधील स्कॉटलंडची अखेरची लढत नेदरलँडविरुद्ध होणार आहे. या लढतीत मोठा पराभव टाळल्यास स्कॉटलंडला मुख्य फेरीत वाटचाल करता येणार आहे.

स्कॉटलंडकडून झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. सिकंदर रझा (३४ धावा), रायन बर्ल (८३ धावा) आणि वेस्ली एम. (४० धावा) यांचा अपवाद वगळता झिम्बाब्वेच्या फलंदाजांना स्कॉटलंडच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावता आले नाही. झिम्बाब्वेचा डाव २०३ धावांवरच संपुष्टात आला. ख्रिस सोल याने ३३ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ब्रँडन मॅकमुलन व मायकेल लिस्क यांनी प्रत्येकी दोन मोहरे टिपले.

याआधी स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २३४ धावा उभारल्या. ख्रिस्तोफर मॅकब्राईड (२८ धावा), मॅथ्यू क्रॉस (३८ धावा), ब्रँडन मॅकमुलन (३४ धावा), जॉर्ज मुंसी (३१ धावा), मायकेल लिस्क (४८ धावा) यांनी स्कॉटलंडसाठी मोलाच्या धावा उभारल्या. झिम्बाब्वेकडून सीन विल्यम्सने तीन, तर तेंदाई चताराने दोन विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक ः स्कॉटलंड ५० षटकांत ८ बाद २३४ धावा (मॅथ्यू क्रॉस ३८, मायकेल लिस्क ४८, सीन विल्यम्स ३/४१) विजयी वि. झिम्बाब्वे ४१.१ षटकांत सर्व बाद २०३ धावा (सिकंदर रझा ३४, रायन बर्ल ८३, ख्रिस सोल ३/३३)

सुपर सिक्समधील ताजा गुणतक्ता

१) श्रीलंका (८ गुण, १.८१७ सरासरी) २) स्कॉटलंड (६ गुण, ०.२९६ सरासरी). ३) झिम्बाब्वे (६ गुण, -०.०९९ सरासरी). ४) नेदरलँड (४ गुण, ०.०४२ सरासरी). ५) वेस्ट इंडीज (० गुण, -०.५१० सरासरी). ६) ओमान (० गुण, -२.०७२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT