PAK vs ZIM Mr Bean Rivelary 
क्रीडा

PAK vs ZIM Mr Bean Rivelary: अखेर झिम्बाब्वेने 'मिस्टर बीन'चा बदला घेतलाच! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

PAK vs ZIM Mr Bean Rivelary : टि-२० वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pakistan VS Zimbabwe) खेळला गेला या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एक धाव राखून पराभव केला, टी 20 वर्ल्डकप 2022 ग्रुप 2 मधील सामन्यात पाकिस्तानने झिम्बब्वेला 130 धावात रोखले. मात्र झुंजार झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या फलंदाजीमधील मर्यादा दाखवून देत एक धावेने पराभव करत मोठा धक्का दिला. या पराभवानंतर चर्चा होतेय ते बदला घेतल्याची..

झिम्बब्वेने सामना जिंकताच सोशल मिडीयावर पाक बीन (Pak Bean) ट्रेंड करु लागले. झिम्बाब्वेने त्या फेक मिस्टर बीनचा बदला घेतला असल्याचे देखील काहीनी म्हटले. चला तर मग हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.

खरंतर या सगळ्याची सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ट्विटने होते. मंगळवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एक ट्विट केले. यामध्ये झिम्बाब्वेसोबतच्या सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रातील काही छायाचित्रे शेअर केली होती. या ट्विटला उत्तर देताना Ngugi Chasura नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिले की, 'झिम्बाब्वेचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी बनावट पाक बीन दाखवला होता. याबद्दल उद्या मैदानावर पाहूण घेऊ. उद्या पाऊस तुम्हाला वाचवेल अशी प्रार्थना करा.'

याला उत्तर देताना सॅम पाकिस्तानी नावाच्या व्यक्तीने विचारले काय झाले भाई? उत्तरात न्गुगी चासुराने लिहिले की, आमचा स्थानिक कार्यक्रम 'अॅग्रिकल्चर शो'मध्ये खऱ्या बीनऐवजी त्यांनी पाकिस्तानची बनावट बीन दाखवला होता. एका यूजरने विचारले की ही पाक बीन कोण आहे? यावर न्गुगी चासुराने पाक बीनचा फोटो शेअर केला. यात एक माणूस आहे जो हुबेहुब मिस्टर बीनसारखा दिसतो. त्यानंतर या पाकिस्तानी बनावट मिस्टर बीनचे अनेक व्हिडिओ फोटो शेअर करण्यात आले आहेत.

आज झिम्बाब्वेने या फेक मिस्टर बिनचा पुरता बदला घेतला असल्याचे अनेक सोशल मिडीया युजर म्हणत आहेत. सोशल मिडीयावर या सामन्यानंतर याबद्दलच्या मीम्सचा महापूर आला आहे. अनेक दिग्गजांनी देखील या मीम्स शेअर केल्या आहेत. कॉमिडीयन वरून ग्रोवर यांनी ट्विट करत झिम्बाब्वेने मिस्टर बीनचा बदला घेतल्याचे म्हटले आहे.

सोशल मिडीयावर लोक मजेशीर मीम्स पोस्ट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT