Kshama Bindu esakal
लाइफस्टाइल

7 फेऱ्यांपासून हनिमूनपर्यंत.. पण, लग्नात असणार नाही 'वर'; 'ही' वधू करणार स्वतःशीच लग्न

सकाळ डिजिटल टीम

लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण घटक असून, तो एक मंगलमय क्षण आहे.

वडोदरा : लग्न (Wedding Ceremony) हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण घटक असून, तो एक मंगलमय क्षण आहे. हा क्षण प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यात एकदा येतच असतो. लग्न म्हणजे काय तर दोन अनोळखी कुटुंब एकत्रित येऊन नवीन नाती निर्माण करणं. तसचं, दोन अनोळखी मन एकत्रित जुळवणं.

मात्र, आम्ही तुम्हाला एका वेगळ्या आणि अनोख्या लग्नाची गोष्ट सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.. इतर नववधूंप्रमाणंच 24 वर्षीय क्षमा बिंदू (Kshama Bindu) 11 जून रोजी लग्न करणार आहे. तिनं लेहेंगा, दागिनंही खरेदी केली आहेत. शिवाय, पार्लरही बुक केलंय. ती नववधू म्हणून मंडपात बसायला तयार आहे. मात्र, तिच्यासोबत फेर्‍या मारायला कोणीही 'वर' नसणार आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, नाही का? पण, हे खरंय!

लग्नात वर नसणार, मग ती कोणासोबत फेरे घेणार? पण, क्षमा एका तरुणाशी नाही, तर स्वतःशीच लग्न करणार आहे. पेहरावापासून ते पारंपरिक विधी पार पाडण्यापर्यंत आणि अगदी सिंदूर घालण्यापर्यंत, लग्नात सर्व काही होईल; पण वर असणार नाहीय. गुजरातमधला (Gujarat) बहुधा हा पहिलाच स्व-विवाह असणार आहे.

'मला कधीच लग्न करायचं नव्हतं'

क्षमानं सांगितलं की 'मला कधीच लग्न करायचं नव्हतं. पण, माझी नवरी व्हायची इच्छा होती. म्हणून, मी स्वतः लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. देशातील कोणत्या महिलांनी स्वत:शी लग्न केलंय का हे शोधण्यासाठी मी ऑनलाइन संशोधनही केलं, पण मला काही सापडलं नाही. कदाचित, मी माझ्या देशातील पहिली मुलगी आहे, जी स्व-प्रेमाचं उदाहरण जगासमोर ठेवलंय.'

'माझं स्वतःवर प्रेम आहे म्हणूनच, मी स्वतःशी लग्न करत आहे'

एका खासगी कंपनीत काम करणारी क्षमा म्हणाली, 'स्व-विवाह म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम असण्याची वचनबद्धता आहे. हे स्व-स्वीकृतीचं कार्य देखील आहे. लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझं स्वतःवर प्रेम आहे आणि म्हणूनच, मी स्वतःशी लग्न करत आहे.

पालकांचा लग्नाला होकार

क्षमा पुढं म्हणाली, 'काही जण स्व-विवाहाला अप्रासंगिक मानू शकतात. परंतु, मी खरोखर जे चित्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे ते म्हणजे महिलांचं महत्त्व आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्या या लग्नाला होकार दिला असून त्यांनी मला आशीर्वादही दिले आहेत.'

मंदिरात करणार लग्न

क्षमानं तिच्या लग्नासाठी गोत्रीचं मंदिरही निवडलंय. लग्नासाठी ती स्वत: पाच शपथाही घेणार आहेत. एवढंच नाही तर लग्नानंतर ती हनीमूनलाही जाणार आहे. यासाठी तिनं गोव्याची निवड केलीय. जिथं ती दोन आठवडे राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT