3 easy steps for hair to protect and shining beautiful in kolhapur 
लाइफस्टाइल

कुरळ्या केसांना ठेवा चमकदार आणि सुंदर; वाचा 3 सोप्या टिप्स

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : तुमचे केस कुरळे असतील तर तुम्हाला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच केसांची चमक राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या समस्यांवर उपाय म्हणून खाली दिलेले 4 उपाय तुम्ही वापरु शकता. 

सूर्याची हानिकारक किरणे त्वचा आणि केस दोन्हींसाठी नुकसानकारक असतात. त्वचेवर याचा परिणाम होतो. यामुळे वेगवेगळे प्रकारचे डाग, त्वचेवरील चमक कमी होते. त्यामुळे त्वचेसह केसांनाही संरक्षण देण गरचेच आहे. पावसाळा असो किंवा उन्हाळा केसांची काळजी कशी घ्यावी हे समजणे गरजेचे आहे. म्हणून आपण केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणार आहोत :

नारळाचे तेल :

नारळाचे तेल त्वचेसह केसांसाठीही फायद्याचे आहे. नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सडेंट असते. त्यामुळे केसांचा गुंता आणि केस तुटण्यापासून वाचतात. केसांना शाम्पू लावण्याआधी नारळाचे तेल लावून, केस धुतल्यानंतर हलकेसे नारळाचे तेल लावावे. त्यामुळे केसांना संरक्षण मिळते आणि त्यांना सावरणेही सोपे होतेय.

हीट प्रोटेक्शन स्प्रे :
 
कोणत्याही कार्यक्रम, लग्न समारंभामध्ये केसांची हेअरस्टाईल करायची असेल तर हीट प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करावा. त्यामुळे केसांचा गुंता होत नाही. त्याचबरोबर  हेअरस्टाईल करतानाच नाही, तर रोज घरातून बाहेर पडताना हीट प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करावा. त्यामुळे सूर्याची हानिकारक किरण तुमच्या केसांची चमक आणि सोंदर्य कमी करू शकणार नाहीत.

खाण्या पिण्याकडे नीट लक्ष देणे

केसांच सोंदर्या आणि चमक टिकवून ठेवायचे असेल तर आपल्या खाण्या पिण्याकडे ही लक्ष ठेवले पाहिजे. अँटीऑक्सीडेंट भरपूर असलेल्या पदार्थांचे प्रमाण आहारात जास्त ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, ई आणि ए असलेले खाद्यपदार्थ, गाजर, हिरव्या पालेभाज्या, फळे, आंबे, केसांसाठी आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT