3 types of yoga do daily mood feel fresh 
लाइफस्टाइल

Yoga : दिवसभर रहाल आनंदी अन् एनर्जेटिक, फक्त तीन आसनं करा, मूड राहील फ्रेश

शारीरिक, मानसिक आणि भावनिक तक्रारींशी लढण्यासाठी योगापासून ताकद मिळते.

सकाळ डिजिटल टीम

शारीरिक, मानसिक आणि भावनिक तक्रारींशी लढण्यासाठी योगापासून ताकद मिळते.

सध्याच्या धावपळीच्या जगात ताणतणाव हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. या ताणामुळे अनेकांना अगदी लहान वयात व्याधींनी ग्रासण्याची शक्यता असते. पण या ताणवासोबत जगण्यापेक्षा त्यावर उपाययोजना केली तर ते आरोग्यासाठी अधिक गुणकारी ठरू शकते. यामुळे आयुष्य सुकर आणि आनंदी होते. ताणावर एकमेव पर्याय म्हणून तज्ज्ञ आणि डॉक्टर योगा करण्याचा सल्ला देतात.

ताण दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम पर्याय आहे. योगा केल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक तक्रारींशी लढण्यासाठी ताकद मिळते. काही योगतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, योगातील विविध आसनांमुळे आपल्याला शांत वाटते आणि ताण दूर होण्यास मदत होते. योगामध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करत असल्याने शरीरातील एनर्जी बाहेर येण्यास मदत होते. मन आणि शरीर यांचे कनेक्शन झाल्यानंतर ताणाव दूर करण्यासाठी योगाच मदत करते. त्यामुळे तज्ज्ञ या काही योग प्रकार करण्याचा सल्ला देतात, ते पुढीलप्रमाणे..

अधोमुख श्वानासन

या योगाच्या आसनामध्ये संपूर्ण शरीरावर ताण येतो. दंड आणि खांदे, मणका, पाय या अवयवांवर ताण आल्याने स्नायू मोकळे होण्यास मदत होते. डोके खाली केल्याने मेंदूला रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे एनर्जी आल्यासारखे वाटते. या योगामध्ये सुरुवातीला पोटावर झोपावे. हात खांद्यांच्या बाजूला घेऊन कंबरेतून शरीर वर उचलावे. यामध्ये पायाचे तळवे आणि हाताचे तळवे जमिनीला टेकलेले राहतात. शरीर वरच्या बाजूला खेचल्यासारखे केल्याने शरीराला चांगला ताण मिळतो. ५ ते १० श्वासांपर्यंत याच स्थितीमध्ये थांबावे. यामुळे आपल्याला एनर्जी आल्यासारखे वाटते.

शवासन

शवासन हे योगातील एक अतिशय महत्त्वाचे योगासन आहे. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे आसन उपयुक्त असते. पाठीवर झोपून हात आणि पाय एकदम रिलॅक्स सोडून द्या. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करत शरीर एकदम रिलॅक्स करा. शरीर आणि मनामध्ये होणारे बदल अनुभवा. तुम्हाला पूर्ण रिलॅक्स झाल्यासारखे वाटत नाही तोपर्यंत किमान ५ ते १० मिनीटे या आसनामध्ये नक्की थांबा. थोडा वेळाने हळूवार एका कुशीवर वळून मग उठा. या आसनामुळे शरीराबरोबरच मनही रिलॅक्स व्हायला मदत होते.

उष्ट्रासन

आपला मणका दिवसरात्र आपल्या शरीराचा भार उचलत असतो. दिवसभराच्या सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी मणक्याचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. दिवसभरातील विविध गोष्टींचा ताण आणि राग याचा स्ट्रेस या मणक्यावर येतो. मात्र उष्ट्रासनात मागे वाकल्याने छाती ओपन होण्यास मदत होते आणि नकळत आपल्याला एनर्जी आल्यासारखे वाटते. गुडघ्यावर बसून दोन्ही पायांमध्ये पुरेसे अंतर घ्यावे. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडून कंबरेतून मागे वाकायचे. हे आसन किंमान ३० सेकंदांपर्यंत टिकवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT